राजकारणलोकसभेची निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीनं लढवा ; 'चार्टर्ड प्लेन'ने कोण कुठे जातं, हे...

लोकसभेची निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीनं लढवा ; ‘चार्टर्ड प्लेन’ने कोण कुठे जातं, हे आम्हाला चांगलंच माहित आहे : निलेश लंके यांचा हल्लाबोल…!

spot_img

आमचा हेडमास्तर ‘पॉवर’ बाज आहे. कारण ‘पॉवर’ इज ए पवार आणि पवार इज ए ‘पॉवर’. पवार साहेबांनी हे गुगली टाकली ना तर केंद्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल. पवार यांच्या आदेशानुसार आम्ही संयमानं बोलत आहोत. मात्र आमच्यावर वैयक्तिक पातळीवरची टीका करण्यापूर्वी जरा विचार करा. लोकसभेची निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनेच लढवा. ‘चार्टर्ड प्लेन’ने कोण कुठे जातं, हे आम्हाला चांगलंच माहित आहे, असा हल्लाबोल नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातल्या महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी खासदार सुजय विखे यांचं नाव न घेता केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत लंके बोलत होते. ते म्हणाले, ‘ या मतदारसंघात 50 वर्षांपासून त्यांची सत्ता आहे, असं तेच सांगताहेत. मग या पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये त्यांनी किमान दहा – वीस हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून का दिला नाही? नुसत्याच विकासाच्या गप्पा मारायच्या याला काही अर्थ नाही.

त्यांनी रोजगार निर्मिती तर केली नाहीच. राहुरी साखर कारखाना बंद पाडला. मुळा – प्रवरा वीज पुरवठा कंपनी बंद पाडली. नुसती बंद पडली नाही तर शासनाचे 2 हजार 200 कोटी रुपये थकवले. संस्था उभ्या करण्याऐवजी त्यांनी संस्था संपविण्याचा घाट घातला. त्यामुळे आता या निवडणुकीत यांना संपवा’. यावेळी तुतारीचा प्रचंड निनाद करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा; बिअर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली एक लाखाची लाच

‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक,...

जामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण …!

समीर शेख / जामखेड चित्रपट, दिग्दर्शक अल्ताफ शेख हे लेखन, दिग्दर्शन, गीतकार या पाठोपाठ आता...

गरिबांचं आरक्षण काढून मुस्लिम बांधवांना देण्याचा काँग्रेस आणि महाआघाडीचा खतरनाक खेळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप …!

'चारा घोटाळ्याच्या आरोपावरुन न्यायालयानं ज्यांना शिक्षा ठोठावली, ते बिहारचे लालू यादव आणि काँग्रेस तसंच...

… आता बसल्या जागी पहा मतदान केंद्राचं अंतरंग ; हरहुन्नरी व्यक्तिमत्व डॉ. अमोल बागुल यांचा अफलातून प्रयोग…!

आभासी वास्तविकता या तंत्रज्ञानाच्या आधारे तुम्ही बसल्या जागी मतदान केंद्राच्या आत काय काय चालतं,...