राजकारणअधिकृत आणि 'अनधिकृत' पत्रकार...! दोघांनाही मिळाले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे 'पास' ;...

अधिकृत आणि ‘अनधिकृत’ पत्रकार…! दोघांनाही मिळाले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे ‘पास’ ; आश्चर्यकारक ‘यंत्रणा’…!

spot_img

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचं अहिल्यानगरच्या (अहमदनगर) संत निरंकारी भवन मैदानावर आज (दि. ७) आयोजन करण्यात आलं. साहजिकच या सभेला तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारीदेखील सभास्थळी उपस्थित होते. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ ही सभा होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सभेला लाखो नागरिकांनी गर्दी केली. या सभेचं वार्तांकन करण्यासाठी जे काही पत्रकार आले होते, त्या पत्रकारांसाठी चक्क दोन प्रकारचे ‘पासेस’ देण्यात आले. खासदार डॉ विखेंच्या ‘यंत्रणे’नं हे काम अत्यंत जबाबदारीनं (?) केलं. यावेळी निळ्या रंगाचा एक आणि लाल रंगाचा एक असे पास पत्रकारांना देण्यात आले.

या सभेत व्यासपीठाजवळ असलेल्या जागेत पत्रकारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना
खासदार डॉ. विखेंच्या ‘यंत्रणे’नं सांगून ठेवलं होतं, की फक्त लाल रंगाचे पास घेऊन येणाऱ्याच पत्रकारांनाच आत सोडा. कारण ते अधिकृत पत्रकार आहेत. ज्यांच्याकडे निळ्या रंगाचे पास आहेत, ते अनधिकृत पत्रकार असून त्यांना मागच्या जागेत बसवा’.

दरम्यान, तोफखाना पोलीस ठाण्यातूनही पत्रकारांना पिवळ्या रंगाचे पासेस देण्यात आले. लाल रंगाचे जे पास होते, त्या पासवर खासदार डॉ. विखेंच्या यंत्रणेतले अनेक कामगार सभास्थळी फिरत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी अशा पद्धतीनं ज्या यंत्रणेनं असं नियोजन केलं, त्या आश्चर्यकारक यंत्रणेला मनापासून सलाम करावासा वाटतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...

मोबाईल दिला नाही म्हणून जामखेड तालुक्यातील तरूण मुलाने संपवले जीवन

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण ) जामखेड - सध्या अनेक विद्यार्थी मोबाईल च्या आहारी गेलेले...

नगरच्या जलतरण तलावात पोहणाऱ्यांची होतेय आर्थिक लूट; 50 रुपयांऐवजी शंभर रुपये घेतल्याचा होतोय आरोप…!

अहिल्यानगरच्या वाडिया पार्क परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हामुळे...