मनोरंजनजामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण ...!

जामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण …!

spot_img

समीर शेख / जामखेड

चित्रपट, दिग्दर्शक अल्ताफ शेख हे लेखन, दिग्दर्शन, गीतकार या पाठोपाठ आता बॉलिवूड चित्रपटात संगीत दिग्दर्शक रुपानं प्रेक्षकांसमोर येत आहेत. अल्ताफ शेख यांनी आगामी हिंदी चित्रपट ‘लोरी’चं गीत लेखन केले असून सुधीर कुमार हजेरी यांच्यासोबत संगीत दिग्दर्शक म्हणून शेख यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

प्रसिध्द गायक सुरेश वाडकर, गायिका उर्मिला धनगर, गायक स्वप्निल बांदोडकर, गायिका प्रियांका बर्वे आणि गायिका अंजली गायकवाड यांनी या चित्रपटाची गाणी गायली आहेत.
दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या सन २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘वेडा बी.एफ.’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला.

या चित्रपटानं ११ कोटी ५० लाख ४५ हजार ७०० रुपये एवढा गल्ला करून रेकॉर्ड ब्रेक करून टाकले. सिनेमातील ‘हे माझे दुर्वेश बाबा’ या गाण्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन ‘लोरी’ या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली. ती त्यांनी सुधीर कुमार हजेरी यांच्यासोबत यशस्वीपणे पार पाडली आहे.

अल्ताफ शेख यांनी त्यांच्या अनोख्या लेखन शैलीतून या आधी चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यापैकी २०१८ मध्ये रिलीज झालेल्या वेडा बी.एफ या हिंदू – मुस्लीम ऐक्यावर भाष्य करणार्‍या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला केला होता. वेडा बी. एफ. चित्रपटाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत.

दरम्यान, साई राम अ क्रिएटिव्ह वर्ल्ड प्रस्तुती असलेल्या लोरी चित्रपटाचे निर्मिती अविनाश कवठणकर यांची असून, दिग्दर्शन राजू रेवणकर यांचं आहे.

डीओपी कुमार डोंगरे, पणती पटेल, राजकुमार, अली शेख, शान कक्कर, रंजीत दास, अभिलाषा घैरा, प्रतिभा शिंपी, आरती शिंदे; तर आर्ट – राजू माळी, मेकअप- केतन, कॉस्च्युम- संगीता चौरे आणि आरती पाटील कुलकर्णी, लाईन प्रोड्यूसर – शाहजहां शेख, प्रोडक्शन मैनेजर- अमजदखान शेख, किरण घोडके, अभिषेक चौरे, हर्ष राजे, मेकअप – किरण सिद्दीद्दी यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदी आणि मराठीतले अनेक कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...

मोबाईल दिला नाही म्हणून जामखेड तालुक्यातील तरूण मुलाने संपवले जीवन

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण ) जामखेड - सध्या अनेक विद्यार्थी मोबाईल च्या आहारी गेलेले...

नगरच्या जलतरण तलावात पोहणाऱ्यांची होतेय आर्थिक लूट; 50 रुपयांऐवजी शंभर रुपये घेतल्याचा होतोय आरोप…!

अहिल्यानगरच्या वाडिया पार्क परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हामुळे...