गुन्हेगारीगुटख्याची वाहतूक करणारे आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गुटख्याची वाहतूक करणारे आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

spot_img

राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिले आहेत.

नमुद आदेशान्वये पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार बाळासाहेब मुळीक, मनोहर गोसावी, सचिन अडबल, संतोष खैरे, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ, प्रशांत जाधव यांचे पथक तैनात करण्यात आले होते.

दि. 24/04/2024 रोजी आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे योगेश कटाळे (रा. कोपरगांव, व किरण लामखडे रा. घारगांव, ता. संगमनेर) या दोघांनी अभय गुप्ता (रा. छोटा बांगरदा रोड, इंदौर, मध्यप्रदेश) यांच्याकडून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल, असा खादय पदार्थ सुगंधीत तंबाखु व पानमसाला, गुटखा खरेदी केलेला असून अभय गुप्ता हा त्याच्या साथीदारांमार्फत पिकअप (क्र. एम.पी. 46 जी. 2357) या गाडीमधून पुणतांबा फाटा येथून कोपरगांव शहरामध्ये व त्यानंतर घारगांव येथे सुगंधीत तंबाखु व पानमसाला गुटखा पाठविणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती.

सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर पोनि आहेर यांनी वरील पथकास कारवाईबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते. या पथकाने तात्काळ पुणतांबा फाटा, कोपरगांव येथे जावुन सापळा रचून थांबले असता बातमीतील नमूद वर्णनाची पिकअप गाडी कोपरगांवच्या दिशेने येतांना दिसली. सदर गाडीचालकास गाडी रोडचे कडेला थांबवून गाडीमध्ये असलेल्या दोन इसमांना त्यांचे नांव गांव विचारले.

त्यांनी त्यांची नावे 1) राजु उमराव भील (वय 32 वर्षे, रा. वार्ड नं. 3 गवाडी, ता. निवाली, जि. बडवाणी, मध्यप्रदेश (चालक), मितेश राजु भाबड (वय – 28 वर्षे, रा. अंबिकापुरी, पाणीटाकीसमोर, इंदौर, मध्यप्रदेश) अशी असल्याची सांगितलं.

ताब्यात घेण्यात आलेल्या या इसमांच्या कब्जातल्या पिकअप गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये 4 लाख 35 हजार 600 रुपये किंमतीचा विमल पानमसाला, 48 हजार 400 रुपये किंमतीची वि – 1 सुगंधीत तंबाखू, 4 लाख 11 हजार 840 रुपये किंमतीचा राज निवास सुगंधीत पानमसाला, 1 लाख 05 हजार 600/- रुपये किंमतीची ZL- 01 जाफरानी सुगंधीत तंबाखू, 6 लाख रुपये किंमतीची पिकअप गाडी क्रमांक एम.पी. 46 जी. 2357 असा एकूण 16 लाख 01 हजार 440/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडे त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता त्यांनी सदरचा गुटखा हा योगेश कटाळे (रा. कोपरगांव व किरण लामखडे रा. घारगांव, ता. संगमनेर) यांनी इसम नामे अभय गुप्ता (रा. छोटा बांगरदा रोड, इंदौर, मध्यप्रदेश) याच्याकडून खरेदी केलेला असून अभय गुप्ता याने सदर गुटखा गाडीमध्ये भरुन पाठविला असल्याचं सांगितल्यानं त्यांच्याविरुध्द कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यातील फरार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पथक शोध घेत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार इसम नामे योगेश विजय कटाळे (वय 34 वर्षे, रा. खडकी, वार्ड नं 1 कोपरगांव ता. कोपरगांव, जि. अहमदनगर) हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून पुढील तपासकामी कोपरगांव शहर पोलीस स्टेशनला हजर केले आहे. पुढील तपास कोपरगांव शहर पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, वैभव कलुबर्मे, शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोतवाली पोलिसांच्या कारवाई 1 हजार 150 किलो गोवंशीय गोमांसासह दोन आरोपी जेरबंद…!

'महासत्ता भारत' वेब न्युज / प्रतिनिधी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोवंशीय जनावरांच्या कत्तल कत्तल करून...

अहमदनगर पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार ; मुळा धरणातल्या पाण्याची होतेय प्रचंड नासाडी ; संबंधितांचं अक्षम्य दुर्लक्ष…!

अहमदनगर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये अक्षरशः पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब झाली आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरू...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा; बिअर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली एक लाखाची लाच

‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक,...

जामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण …!

समीर शेख / जामखेड चित्रपट, दिग्दर्शक अल्ताफ शेख हे लेखन, दिग्दर्शन, गीतकार या पाठोपाठ आता...