ब्रेकिंगमोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा...! अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयात कुत्री सोडणार...! 'आय लव अहमदनगर'...

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा…! अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयात कुत्री सोडणार…! ‘आय लव अहमदनगर’ फाउंडेशनचे साहेबान जहागिरदार यांचा इशारा..!

spot_img

नगर शहरात मोकाट कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. ही मोकाट कुत्री दुचाकी वाहनांच्या पाठीमागे धावतात. त्यामुळे किरकोळ अपघात होतात. रात्री अपरात्री ही मोकाट कुत्री पायी ये – जा करणाऱ्या नागरिकांचा पाठलाग करताहेत, त्यांना चावा घेताहेत. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त महापालिकेनं केला नाही तर लवकरच ही सर्व मोकाट कुत्री महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त पंकज जावळे यांच्या कार्यालयात सोडून देऊ, असा इशारा ‘आय लव अहमदनगर’ फाउंडेशनचे अध्यक्ष साहेबान जहागिररदार यांनी दिला आहे.

या संदर्भात जहागिरदार यांनी म्हटलं आहे, की महापालिका प्रशासनाला किरकोळ असा मोकाट कुत्र्यांचा प्रश्नदेखील मार्गी लावता येत नाही, हे नगरकरांचं मोठं दुर्दैव आहे. रस्त्यावरचे खड्डे आणि सर्वत्र दुर्गंधी हे चित्र तर नगरकरांच्या पाठीला कायमचं चिकटलेलं आहे.

प्रामाणिकपणे संकलित कर भरूनदेखील नगरकरांना नागरी मुलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिला असल्यामुळे ही मोठी संतापजनक बाब आहे.

महापालिका प्रशासनानं मोकाट कुत्र्यांचं निर्बिजीकरण करण्यासाठी ठेका दिला असला तरी निर्बिजीकरण होण्याऐवजी मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार असून याचीदेखील चौकशी महापालिका प्रशासनानं करण्याची गरज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा; बिअर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली एक लाखाची लाच

‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक,...

जामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण …!

समीर शेख / जामखेड चित्रपट, दिग्दर्शक अल्ताफ शेख हे लेखन, दिग्दर्शन, गीतकार या पाठोपाठ आता...

गरिबांचं आरक्षण काढून मुस्लिम बांधवांना देण्याचा काँग्रेस आणि महाआघाडीचा खतरनाक खेळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप …!

'चारा घोटाळ्याच्या आरोपावरुन न्यायालयानं ज्यांना शिक्षा ठोठावली, ते बिहारचे लालू यादव आणि काँग्रेस तसंच...

… आता बसल्या जागी पहा मतदान केंद्राचं अंतरंग ; हरहुन्नरी व्यक्तिमत्व डॉ. अमोल बागुल यांचा अफलातून प्रयोग…!

आभासी वास्तविकता या तंत्रज्ञानाच्या आधारे तुम्ही बसल्या जागी मतदान केंद्राच्या आत काय काय चालतं,...