राजकारणबहुजन ओबीसी समाज पार्टीचे उमेदवार माझी आयुक्त डॉक्टर दिलीप खेडकर यांनी श्रीगोंद्यात...

बहुजन ओबीसी समाज पार्टीचे उमेदवार माझी आयुक्त डॉक्टर दिलीप खेडकर यांनी श्रीगोंद्यात केला आचारसंहितेचा भंग!

spot_img

अंकुश शिंदे /श्रीगोंदे :- नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेवार माजी आयुक्त डॉ. दिलीप कोंडीबा खेडकर हे लोकसभा निवडणुकीसंदर्भात गाठी भेटी व प्रचार करत आहेत. देशात व राज्यात आदर्श आचार संहिता लागू आहे. एम एच 12 आर पी 5000 ही लेंड क्रुझर गाडीवर गवर्मेंट ऑफ इंडिया असा बोर्ड लावून एक माजी सनदी अधिकारी हा लोकसभेचा उमेदवार मतदार, कार्यकर्ते आणी सरकारी कर्मचारी यांच्यावर छाप पाडण्यासाठी राजरोसपणे या गाडीचा वापर करत आहे. याकडे निवडणूक निर्णय अधिकारी, भरारी पथक जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेवार माजी आयुक्त डॉ. दिलीप कोंडीबा खेडकर हे आज गुरुवार दि.11 श्रीगोंदा येथे हॉटेल ए स्टार येथील हॉल मध्ये पत्रकार परिषद आणि ओबीसी समाज बांधवांसाठी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी एम एच 12 आर पी 5000 ही लेंड क्रुझर या गाडीतून श्रीगोंद्यात प्रचारासाठी आले होते. सदर गाडी ही पुजा दिलीप खेडकर यांच्या नावावर असुन, पुजा खेडकर या पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात उच्च पदावर काम करीत आहेत. एक माजी उपायुक्त तर मुलगी उच्च पदस्थ सनदी अधिकारी हेच जर आदर्श आचार संहितेचा भंग करीत असतील तर राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आचार संहितेचा भंग केल्यास नवल वाटू नये.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओव्हरलोड गाड्यांची पासींग करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी आरटीओ एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल…!

ओव्हरलोडच्या तीन गाड्यांची पासिंग करण्यासाठी अशरफ खान आणि अरफान खान या आरटीओ एजंटांनी 41...

नगरची एमआयडीसी लवकरच घेणार मोकळा श्वास ; पोलीस बंदोबस्तात हटविली जाणार अतिक्रमणं : कार्यकारी अभियंता संदीप बडगे यांची माहिती …!

नगरच्या एमआयडीसी परिसरात झालेली अतिक्रमणं हा विषय उद्योजकांसह सर्वांचीच डोकेदुखी बनला आहे. टपऱ्या, हातगाड्या,...

मे महिन्यात कोणत्या कारला मिळालीय ग्राहकांची पसंती ; घ्या जाणून…!

नवी कोरी कार विकत घेऊन त्या कारमधून 'लॉंग ड्राईव्ह' करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र...

तडीपार सुनील शिरसाठ कोतवाली पोलिसांनी केला जेरबंद …!

लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगानं कोतवाली पोलीस स्टेशनकडील सराईत गुन्हेगारांना जिल्हयातून तडीपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी,...