राजकारण'त्या' निलेश लंके यांच्या आडून खासदार डॉ. विखेंचा 'डमी' खेळ : महाविकास...

‘त्या’ निलेश लंके यांच्या आडून खासदार डॉ. विखेंचा ‘डमी’ खेळ : महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप…!

spot_img

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या गंमतीशीर घटना घडणार आहेत. त्यापैकीच एक घटना आज (दि. २६) घडली. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करताना ही घटना प्रकर्षानं समोर आली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे निलेश ज्ञानदेव लंके हे खासदार डॉ. विखे यांच्या विरोधात उभे असताना दुसरे एक निलेश साहेबराव लंके हे कामोठे, वाशी, नवी मुंबईत व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले आणि पारनेरच्या मतदार यादीत नाव असलेले निलेश साहेबराव लंके हे उमेदवार या लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत.

दरम्यान, यासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज (दि. २६) पत्रकार परिषद घेऊन खा. डॉ. विखे यांच्यावर गंभीर आरोप केला. निलेश साहेबराव लंके हा डमी उमेदवार खासदार डॉक्टर विखे यांनीच दिला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेप्रसंगी शिवसेनेचे (उबाठा) दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे फाळके म्हणाले, की ‘खासदार डॉ. विखे यांची डिग्रीसुद्धा डमी असून त्यांच्या संपत्तीच्या वाटप प्रक्रियेत डमी वारसदार उभा केला असल्याचा आरोप त्यांचे चुलते अशोक विखे यांनी केला आहे. या निलेश साहेबराव लंके यांच्या उमेदवारीबद्दल आमचा काहीही आक्षेप नाही. मात्र या लंके यांच्याआडून खा. डॉ. विखे हे आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शकतात.

लंके या डमी उमेदवाराचे काही ‘वेडेवाकडे’ धंदे आहेत की नाही, हे आम्हाला माहीत नाही. मात्र त्यांच्याआडून महाविकास आघाडीच्या निलेश ज्ञानदेव लंके यांच्यावर आरोप करायचे, हे षडयंत्र यामध्ये असू शकते. त्याचबरोबर निलेश साहेबराव लंके यांना खा. डॉ. सुजय विखे यांना पाठिंबा द्यायला सांगून या निवडणुकीत गोंधळ घालायचा उद्देश खा. डॉ. विखे यांचा असल्याचं फाळके म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा; बिअर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली एक लाखाची लाच

‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक,...

जामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण …!

समीर शेख / जामखेड चित्रपट, दिग्दर्शक अल्ताफ शेख हे लेखन, दिग्दर्शन, गीतकार या पाठोपाठ आता...

गरिबांचं आरक्षण काढून मुस्लिम बांधवांना देण्याचा काँग्रेस आणि महाआघाडीचा खतरनाक खेळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप …!

'चारा घोटाळ्याच्या आरोपावरुन न्यायालयानं ज्यांना शिक्षा ठोठावली, ते बिहारचे लालू यादव आणि काँग्रेस तसंच...

… आता बसल्या जागी पहा मतदान केंद्राचं अंतरंग ; हरहुन्नरी व्यक्तिमत्व डॉ. अमोल बागुल यांचा अफलातून प्रयोग…!

आभासी वास्तविकता या तंत्रज्ञानाच्या आधारे तुम्ही बसल्या जागी मतदान केंद्राच्या आत काय काय चालतं,...