गुन्हेगारीकोतवाली पोलिसांच्या कारवाई 1 हजार 150 किलो गोवंशीय गोमांसासह दोन आरोपी जेरबंद...!

कोतवाली पोलिसांच्या कारवाई 1 हजार 150 किलो गोवंशीय गोमांसासह दोन आरोपी जेरबंद…!

spot_img

‘महासत्ता भारत’ वेब न्युज / प्रतिनिधी

कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोवंशीय जनावरांच्या कत्तल कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याची गोपनीय माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती.
त्यांनी तात्काळ पथक तयार करुन गोवंशीय जनावरांच्या कत्तल करण्यास बंदी असताना गोवंश जनावरांचे मांस त्यांचे ताब्यात विक्री करण्याचे उद्देशाने बाळगून विक्री करणाऱ्या कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईत १ हजार १५० किलो गोमांस जप्त केले. ही कारवाई रेल्वेस्टेशन परिसरातल्या अचानक चाळ आणि बाबा बंगाली चौकात करण्यात आली. गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करणाऱ्यावर कोतवाली पोलिसांनी कारवाई करत १ हजार किलो गोमांस जप्त केलं.

याप्रकरणी शोएब अब्दुल रऊफ कुरैशी यांच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल सत्यजित शिंदे यांनी गुन्हा दाखल केला आहे. बाबा बंगाली भागात कारी मशीदीचे पश्चिमेस सार्वजनिक बंद पडलेल्या शौचालया समोर एक इसम गोवंशी जनावरांच्या मांस झेंडीगेट परिसरात जावून खात्री केली असता सदर ठिकाणी मांस विक्री सुरू असल्याचे दिसले. कोतवाली पोलिस पथकाने विक्री – करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन टपरीची झडती घेतली असता तेथे १००० हजार किलो गोमांस, एक लोखंडी सुरी, वजनकाटे असा एकून  दोन लाख रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला.

दुसऱ्या कारवाईत स्टेशनरोडवरील अचानक चाळ येथे इद्रीस कुरैशी हा गोवंश जातीचे जनावरांचे मांस त्याचे दुकानात विक्री करीत आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळालेले मिळाल्याने कोतवाली पोलीस पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचनेवरून त्या ठिकाणी गेले असता अचानक चाळ येथील एका गाळ्यात एक इसम हातात सत्तुर घेवुन त्याचे समोर असलेल्या वजन काट्यावर वजन करुन त्यांचे ताब्यातील मांसाची दुकानात येणारे ग्राहकांना विक्री करताना दिसला. कोतवाली पोलिसांनी  छापा टाकला. त्या इसमास आहे त्या परिस्थितीत थांबण्यास सांगून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव इद्रीस रशीद कुरेशी, (वय ५० वर्षे, रा.बेपारी .झेंडीगेट, अ.नगर) असे सांगितले. त्यास मांस कशाचे आहे तसेच मांस विक्रीचा परवाना तसेच पशु वैदयकी पशु वैदयकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्राबाबत विचारपूस केली असता, त्याने सदर मास हे गोवंशीय जनावराचे असून कोणताही प्रकारचा विक्रीचा परवाना तसेच पशु वैदयकीय अधिकारी यांचे कोणतेही प्रमाणपत्र नसल्याबाबत सांगितलं.

पोलिसांनी तिथं झडती घेतली असता झडतीमध्ये ३० हजार रुपये किंमतीचे गोवंशीय जनावरांचे मांसाचे लहान मोठे तुकडे, १ हजार रुपये किंमतीचा एक वजनकाटा, व त्यासोबत एक किलोचे वजनाचे माप १०० रुपये किंमतीचा एक लोखंडी सत्तूर असा ३१ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सुरज कदम यांनी इद्रिस कुरेशी यांचे विरुध्द भा.दं. वि. कलम २६९, महा. प्राणी रक्षा अधि सन १९९५ चे सुधारीत सन २०१५ चे कलम ५ (क), ९ (अ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दिपक रोहकले, ए. पी. इनामदार, तानाजी पवार, सत्यजित शिंदे, सुरज कदम, प्रमोद लहारे, सचिन लोळगे यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...

मोबाईल दिला नाही म्हणून जामखेड तालुक्यातील तरूण मुलाने संपवले जीवन

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण ) जामखेड - सध्या अनेक विद्यार्थी मोबाईल च्या आहारी गेलेले...

नगरच्या जलतरण तलावात पोहणाऱ्यांची होतेय आर्थिक लूट; 50 रुपयांऐवजी शंभर रुपये घेतल्याचा होतोय आरोप…!

अहिल्यानगरच्या वाडिया पार्क परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हामुळे...