गुन्हेगारीराज्याच्या पर्यटन आणि शालेय शिक्षण विभागात नक्की चाललंय तरी काय? 67 लाखांचा...

राज्याच्या पर्यटन आणि शालेय शिक्षण विभागात नक्की चाललंय तरी काय? 67 लाखांचा तपास अर्धवट असतानाच अज्ञातांनी पुन्हा 47 लाखांवर मारलाय डल्ला…!

spot_img

राज्याच्या पर्यटन विभागाच्या बँक खात्यातून अज्ञात लोकांनी 67 लाख रुपये चोरले होते. या घटनेला एक महिना पूर्ण झाला नाही, तोच पुन्हा एकदा राज्याच्या शालेय शिक्षण विभागातून अज्ञातांनी 47 लाख रुपये ढापले आहेत. लाखो रुपयांवर डल्ला मारला जात असताना राज्य शासनाच्या या दोन्ही विभागांत नक्कीच चाललंय तरी काय, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागातून 47 लाख रुपये चोरीला गेल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्प्यांमध्ये 47 लाख 60 हजार रुपये काढण्यात आले आहेत.

मंत्रालयातल्या बँकेच्या शाखेतून चोरट्याने हे लाखो रुपये काढले असल्याचं जळजळीत आणि तितकंच खळबळजनक वास्तव चव्हाट्यावर आलं असून चार व्यक्तींच्या नावावर ही रक्कम जमा झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, ही सर्व बँक खाती कोलकाता येथील असून नमिता बेग, प्रमोद सिंग, तप कुमार, झीनत खातून यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी या चौघांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 419, 420, 465 467, 471 473, 34 नुसार गुन्हा दाखल केलाय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेअर मार्केटच्या नावाखाली 38 जणांची 1 कोटी 12 लाखांची आर्थिक फसवणूक…!

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाउंट उघडलं आहे, असं सांगून काही दिवस चांगल्या प्रकारे...

विकासात्मक संतुलनाच्या आधारावर नवभारत निर्माण हेच भाजपचे स्वप्न : सुजय विखे यांचं वक्तव्य

भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे....

शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा येणार हर्षद मेहता आणि केतन पारेख ; उद्योगपती हर्ष गोयंका यांनी व्यक्त केलीय भीती…!

शेअर्सच्या किंमतीमध्ये छेडछाड केली जात असून शेअर बाजारात मोठी गडबड होत आहे. यामुळे गुंतवणूकदाराचं...

कर्ज हवंय? अहो, मग आधारकार्डवर मिळतंय ना कर्ज ; काय आहे प्रक्रिया ; घ्या जाणून …!

आधारकार्डवर तुम्हाला काही मिनिटांत पर्सनल लोन मिळू शकतं. त्याची प्रक्रिया काय आहे, त्याविषयी आज...