शेअर मार्केटशेअर मार्केटच्या नावाखाली 38 जणांची 1 कोटी 12 लाखांची आर्थिक फसवणूक...!

शेअर मार्केटच्या नावाखाली 38 जणांची 1 कोटी 12 लाखांची आर्थिक फसवणूक…!

spot_img

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाउंट उघडलं आहे, असं सांगून काही दिवस चांगल्या प्रकारे ‘रिटर्न्स’ देत दोघांनी संबंधितांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मात्र कुठलाही ‘रिटर्न्स’ आणि गुंतवलेली रक्कम परत न देता 38 जणांची तब्बल एक कोटी 12 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

प्रशांत सिताराम खाडे आणि सिताराम खाडे या पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सुहास बजरंग शेजवळ (रा. तानाजीनगर, पिंपरी चिंचवड, पुणे) यांनी फिर्याद दिली.

आरोपी प्रशांत आणि त्याचे वडील सिताराम या दोघांनी संगनमत करुन फिर्यादी आणि त्यांचे सहकारी मित्र अशा 37 लोकांचा विश्वास संपादन केला. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यासाठी तुमच्या सर्वांचे ‘डिमॅट’ अकाउंट उघडलं असल्याचं आरोपींनी सांगितलं. आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फिर्यादीकडून दहा लाख 38 हजार तर इतर 37 जणांकडून 1 कोटी 1 लाख 90 हजार असे एकूण एक कोटी बारा लाख 28 हजार रुपये चेकद्वारे घेतले.

मोठ्या रकमेची गुंतवणूक केल्यानंतर आरोपींनी ‘रिटर्न्स’ देणं बंद केलं. ‘डिमॅट’ अकाउंट उघडल्याचं एलकेपी कंपनीचं खोटं प्रमाणपत्रंसुद्धा आरोपींनी फिर्यादीला दिलं. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘महासत्ता भारत’ ब्रेकिंग न्यूज…! 50 वर्षीय इसमानं 80 फूट पाणी असलेल्या विहिरीत घेतली उडी…!

नेवासे तालुक्यातल्या लोहगाव परिसरात 80 फूट पाणी असलेल्या एका विहिरीत जाधव आडनावाच्या इसमानं (संपूर्ण...

शरद पवार हे धर्मनिरपेक्षवादी नाहीत, ते तर संधी साधू : प्रकाश आंबेडकर यांचं खळबळजनक वक्तव्य…!

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा उद्यापासून (दि. २०) सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय...

मिलिंद चवंडके यांना प. पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन राज्यस्तरीय अध्यात्मिक पुरस्कार जाहिर

योगतज्ञ परमपूज्य दादाजी वैशंपायन यांच्या १०५ व्या जयंती उत्सवानिमित्त यावर्षीचा राज्यस्तरीय अध्यात्मिक पुरस्कार नारायण...

बापानंच केला मुलाचा खून ; नेवासे तालुक्यातली खळबळजनक घटना…!

नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गोधेगाव इथं राहणाऱ्या शिवाजी दादासाहेब जाधव (मयत) याच्या शेती वाटपाच्या...