शेअर मार्केटशेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा येणार हर्षद मेहता आणि केतन पारेख ; उद्योगपती...

शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा येणार हर्षद मेहता आणि केतन पारेख ; उद्योगपती हर्ष गोयंका यांनी व्यक्त केलीय भीती…!

spot_img

शेअर्सच्या किंमतीमध्ये छेडछाड केली जात असून शेअर बाजारात मोठी गडबड होत आहे. यामुळे गुंतवणूकदाराचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. शेअर बाजारात पुन्हा एकदा हर्षद मेहता यांची पुनरावृत्ती होणार आहे, अशी भीती प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी व्यक्त केली आहे.

पूर्वीचे ट्विटर आणि सध्याच्या एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर गोएंका यांनी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, की प्रमोटर कंपन्यांचा नफा वाढवून दाखवत आहेत. गुजराती – मारवाडी ब्रोकरांना हाताशी धरून शेअर्सच्य किंमतीना अवास्तव स्तरावर नेले जात आहे. आता वेळ आली आहे की, सेबी आणि अर्थ मंत्रालयाने यात हस्तक्षेप करावा आणि छोट्या गुंतवणूकदारांना मोठं नुकसान होण्यापासून वाचवावे.’

दरम्यान, ३ मे रोजी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाल्यानंतर हर्ष गोयंका यांनी ही पोस्ट टाकली होती. त्यादिवशी सेन्सेक्समध्ये जवळपास १००० अंकाची घसरण होऊन ७४ हजाराच्या खाली निर्देशांक पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांकही २०० अंकांनी घसरला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मिलिंद चवंडके यांना प. पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन राज्यस्तरीय अध्यात्मिक पुरस्कार जाहिर

योगतज्ञ परमपूज्य दादाजी वैशंपायन यांच्या १०५ व्या जयंती उत्सवानिमित्त यावर्षीचा राज्यस्तरीय अध्यात्मिक पुरस्कार नारायण...

बापानंच केला मुलाचा खून ; नेवासे तालुक्यातली खळबळजनक घटना…!

नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गोधेगाव इथं राहणाऱ्या शिवाजी दादासाहेब जाधव (मयत) याच्या शेती वाटपाच्या...

भारतीय संविधानाला धक्का लावणार नाही, हे ठणकावून सांगा ; राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केल्या ‘अशा’ सात अपेक्षा…!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा असलेल्या राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सात...

लाच घेतांना तलाठ्याला रंगेहाथ पकडलं ; महसूल विभागात गोंधळ…!

खरेदी केलेल्या शेतीची रजिस्ट्री करण्यात आल्यानंतर फेरफार पाहण्यासाठी तलाठ्यानं तक्रारदाराला दोन हजार रुपये लाच...