लेटेस्ट न्यूज़आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; 'त्या' मयत युवकाच्या परिवाराला...

आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; ‘त्या’ मयत युवकाच्या परिवाराला 1 लाख 51 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा केला निर्धार …!

spot_img

नेवासे तालुक्यातल्या सोनईत दर रविवारी वाहन मेळावा भरत असतो. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. स्व. दादा वाघ यांनी सुरु केलेली ही परंपरा त्यांची मुलं जपत आहेत. दरम्यान, या परिवारातल्या अतुल बाबुराव गडाख या सदस्याचं 20 मार्च रोजी निधन झालं. आज (दि. 29) त्याच्या दशक्रियाविधीच्या निमित्तानं आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाच्यावतीनं एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला.

मयत अतुल गडाखच्या परिवाराला 1 लाख 51 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्धार करण्यात आला. मयत अतुल गडाख याच्या मुला – मुलींच्या शिक्षणासाठी या आर्थिक मदतीचा सदुपयोग केला जाणार आहे.

सोनईचे सरपंच धनंजय वाघ, मल्हारी वाघ, रमाकांत (अण्णा) वाघ, भाऊसाहेब भुसाळ आदींसह सोनईतल्या व्यापारी मित्र मंडळाच्या अनेक सदस्यांनी यासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमाबद्दल आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या सदस्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘त्या’ निलेश लंके यांच्या आडून खासदार डॉ. विखेंचा ‘डमी’ खेळ : महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप…!

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या गंमतीशीर घटना घडणार आहेत. त्यापैकीच एक...

गुटख्याची वाहतूक करणारे आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना...

लोकांच्या भावनेशी खेळून मतदान मिळत नाही : खासदार डॉ. विखे याचं टिकास्त्र …!

आम्ही कामं करणारी माणसं आहोत. लोकांना कामं हवी असतात. सोशल मिडियावर व्हिडिओ तयार करून...