गुन्हेगारी12 वर्षानंतर निवृत्त शिक्षिकेला मिळालं चोरी गेलेलं सोन्याचं गंठन ...!

12 वर्षानंतर निवृत्त शिक्षिकेला मिळालं चोरी गेलेलं सोन्याचं गंठन …!

spot_img

दि. २६ जानेवारी २०१२ रोजी सकाळी ०६/३० वा. सुमारास नगर-पुणे महामार्ग आरती हॉटेल समोरुन सुनिता सोन्याबापू सोनवणे (रा. शाहुनगर, केडगांव, अहमदनगर) या शिक्षिका २६ जानेवारीनिमित्त झेंडावंदन कार्यक्रमाकरीता त्यांच्या दुचाकीवरुन १०८ महंत पंडीत माध्यमिक विदयालय, नुतन कन्या शाळा, अहमदनगर येथे जात होत्या. तेवढ्यात दुचाकीवरुन आलेल्या सोनसाखळी चोरांनी त्यांच्या गळ्यातलं ०१ तोळा वजनाचं सोन्याचं मिनी गंठन ओढून चोरुन नेलं.

याप्रकरणी त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिसांनी आरोपीला अटक करुन सुनिता सोन्याबापू सोनवणे यांच्या गळयातलं ०१ तोळा वजनाचे सोन्याचे गंठन सन २०१२ मध्ये हस्तगत केलं होतं.

सुमारे १२ वर्षे उलटूनही सुनिता सोन्याबापू सोनवणे (सेवानिवृत्त शिक्षिका, रा.शाहुनगर, केडगांव अहमदनगर) यांचे ०१ तोळा वजनाचे सोन्याचे गंठन त्यांना परत मिळाले नव्हते. अशा प्रकारच्या बऱ्याच फिर्यादींचा गुन्हा दाखल होऊन मुदद्देमाल जमा झालेला असतांना फिर्यादी यांचे मोबाईलनंबर तसंच रहाण्याचा पत्ता बदलल्यानं सदरचे जमा झालेले सोन्याचे दागिने परत करण्याकरिता मोठी अडचण निर्माण झाली होती.

दरम्यान, कोतवाली पोलीसांकडून अशा तक्रारदारांची यादीसह दि. ०९/१०/२०२३ रोजी प्रेसनोट जारी करण्यात आली होती. सदर बाबत पोहेकॉ शेख तनवीर व महीला पोकों/जयश्री सुद्रीक अशांनी मोठे परिश्रम घेत अशा प्रकारचे तक्रार यांचे नांवे, पत्ते, संपर्क नंबर शोधून काढून त्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगत न्यायालयाच्या आदेशान्वये बऱ्याच लोकांना त्यांचा किंमती मुददेमाल कायदेशीर कामकाज पूर्ण करुन परत करण्यात आला.

त्याप्रमाणे राकेश ओला (पोलीस अधिक्षक, अहमदनगर), प्रशांत खैरे (अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर), अमोल भारती (उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग अहमदनगर) यांचे मार्गदर्शनाखाली आज दि. २५/०४/२०२४ रोजी प्रताप दराडे (पोलीस निरीक्षक) यांनी पोहेकों शेख तनवीर व महिला पोकों/जयश्री सुद्रीक यांच्या मदतीने फिर्यादी सुनिता सोन्याबापू सोनवणे रा. शाहुनगर, केडगांव अहमदनगर यांचा शोध घेवून त्यांनी दि. २६/१२/२०१२ रोजी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जप्त केलेले ०१ तोळा सोन्याचे गंठन त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या कामगिरीबद्दल त्यांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विकासात्मक संतुलनाच्या आधारावर नवभारत निर्माण हेच भाजपचे स्वप्न : सुजय विखे यांचं वक्तव्य

भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे....

शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा येणार हर्षद मेहता आणि केतन पारेख ; उद्योगपती हर्ष गोयंका यांनी व्यक्त केलीय भीती…!

शेअर्सच्या किंमतीमध्ये छेडछाड केली जात असून शेअर बाजारात मोठी गडबड होत आहे. यामुळे गुंतवणूकदाराचं...

कर्ज हवंय? अहो, मग आधारकार्डवर मिळतंय ना कर्ज ; काय आहे प्रक्रिया ; घ्या जाणून …!

आधारकार्डवर तुम्हाला काही मिनिटांत पर्सनल लोन मिळू शकतं. त्याची प्रक्रिया काय आहे, त्याविषयी आज...

संविधानाचं रक्षण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करु शकतात ; आंबेडकरी चळवळीची मतं निर्णायक : आरपीआय कवाडे गटाचे सुमेध गायकवाड यांचा विश्वास…!

कॉंग्रेस पक्षानं सर्वाधिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित केलंय. या अपमानाचा बदला म्हणूनच आरपीआय कवाडे...