राजकारणमातंग समाज हा दिलेला शब्द पाळणारा समाज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन;...

मातंग समाज हा दिलेला शब्द पाळणारा समाज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन; ‘बार्टी’प्रमाणंचं ‘आर्टी’ची केली घोषणा..!

spot_img

मातंग समाज हा दिलेला शब्द पाळणारा समाज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन; ‘बार्टी’प्रमाणंचं ‘आर्टी’ची केली घोषणा..!

आम्ही खूप भाग्यवान आहोत, की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर शौर्य गाजविणारे लहुजी वस्ताद यांच्या पूर्वजांना आजच्या अविस्मरणीय अशा प्रसंगी आम्ही मानवंदना देऊ शकलो.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा पुढे नेणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक उभारले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांच्या आदर्शानुसार चालणारे सरकार असल्याने सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. मातंग समाज प्रामाणिक आणि कष्टाळू आहे, दिलेला शब्द पाळणारा आहे. बार्टीप्रमाणे आर्टीची स्थापना करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे मातंग समाजातील मुलांना आता उच्च शिक्षण घेता येईल. स्पर्धेच्या युगात या समाजाला इतर समाजाच्या बरोबर विकासात सहभागी करून घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

खरं म्हणजे लहुजी वस्ताद यांच्या आजोबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर स्वराज्याच्या निर्मितीसाठी मोठं अनमोल असं योगदान दिलं आहे. ज्या समाजात लहुजी जन्माला आले, तो समोर शब्दाला पक्का आहे. दिलेला शब्द पाळणारा हा समाज आहे, असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. दरम्यान, ‘बार्टी’प्रमाणं मातंग समाज बांधवांसाठी ‘आर्टी’ची घोषणादेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. यामुळे मातंग समाजातल्या तरुणांना शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होतील, असं ते म्हणाले.

पुण्यातल्या विश्रांतवाडी जवळच्या संगमवाडी परिसरात साडे पाच एकरात उभारण्यात येणाऱ्या लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या भुमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लहुजी वस्ताद यांच्या जीवन कार्याचा गौरव करत लहुजी वस्ताद साळवे हे छत्रपती शिवरायांचे मावळे होते आणि या मावळ्याच्या स्मारकाच्या भुमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहता आलं, याबद्दल आम्ही मोठे भाग्यवान आहोत, अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं, की पुरंदरच्या किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी लहुजी वस्ताद यांच्या आजोबांवर सोपविली होती. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वतःला समर्पित करणारं घराणं, अशी या घराण्याची ओळख होती. आजच्या तरुणांनी लहुजी वस्ताद साळवे यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रास्ताविक केले. साडेपाच एकर जागा आरक्षित करण्यात आली असून स्मारकाच्या कामावर ११५ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यात म्युझिअम, आर्ट गॅलरी, वसतिगृह, वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण हॉल आदी सुविधा असतील. परिसरात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा ३५ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. नगर नियोजन योजने अंतर्गत उरळी देवाची येथे विकासकामे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत दादा पाटील, आमदार सुनील कांबळे, स्मारकाचे अध्यक्ष अशोक लोखंडे, आमदार नामदेव ससाणे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मा.अमित गोरखे, जेजुरी देवस्थान चे अध्यक्ष मा.अनिल सैंदाणे, मारुती वाडेकर, शंकरभाऊ तडाखे, बिपीन घोरपडे, सुदाम धुपे, ऍड.राम चव्हाण, राजाभाऊ सूर्यवंशी, युवराज दाखले, भास्कर नेटके, सुखदेव अडागळे, चंद्रकांत काळोखे, अविनाश कांबीकर, आदींसह मातंग समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नागरदेवळेच्या युवकावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

पुष्कर संतोष शेलार (रा. नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर) हा युवक नागरदेवळे गावातून त्याच्या मित्रासोबत...

कोतवाली पोलिसांच्या कारवाई 1 हजार 150 किलो गोवंशीय गोमांसासह दोन आरोपी जेरबंद…!

'महासत्ता भारत' वेब न्युज / प्रतिनिधी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोवंशीय जनावरांच्या कत्तल कत्तल करून...

अहमदनगर पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार ; मुळा धरणातल्या पाण्याची होतेय प्रचंड नासाडी ; संबंधितांचं अक्षम्य दुर्लक्ष…!

अहमदनगर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये अक्षरशः पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब झाली आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरू...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा; बिअर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली एक लाखाची लाच

‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक,...