गुन्हेगारीअवैध धंद्यांवरच्या कारवाईतून 7 लाख 40 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त ;...

अवैध धंद्यांवरच्या कारवाईतून 7 लाख 40 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त ; अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा कारवाई

spot_img

राकेश ओला (पोलीस अधीक्षक अहमदनगर) यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांना माहे फेब्रुवारी 2024 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने अवैध धंद्यांची माहिती घेवून जास्तीत जास्त अवैध धंद्यांविरुध्द कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते.

नमूद आदेशान्वये पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके नेमून अवैध धंद्याची माहिती घेत कारवाई करण्याबाबत सुचना दिल्यानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अहमदनगर जिल्ह्यातील अवैध दारु विक्री करणाऱ्या 86 ठिकाणी छापे टाकले.

या कारवाईत 5 लाख 25 हजार 100 रुपये किंमतीची अवैध देशी, विदेशी दारु तसेच तयार गावठी हातभट्टी व कच्चे रसायन नाश करुन 87 आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करुन कारवाई केली. जुगार, मटका, बिंगो चालविणारे 40 ठिकाणी कारवाई करुन 2,15,520/- किंमतीची रोख रक्कम व जुगाराची साधने जप्त करुन 56 आरोपी विरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे कारवाई केली.

माहे फेब्रुवारी 2024 मध्ये स्थागुशा पथकाने अहमदनगर जिल्ह्यात 126 अवैध धंद्याविरुध्द कारवाई करुन 7,40,620/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 143 आरोपी ताब्यात घेतले. यापुढेदेखील अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे.

सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व जिल्ह्यातल्या सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...

मोबाईल दिला नाही म्हणून जामखेड तालुक्यातील तरूण मुलाने संपवले जीवन

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण ) जामखेड - सध्या अनेक विद्यार्थी मोबाईल च्या आहारी गेलेले...

नगरच्या जलतरण तलावात पोहणाऱ्यांची होतेय आर्थिक लूट; 50 रुपयांऐवजी शंभर रुपये घेतल्याचा होतोय आरोप…!

अहिल्यानगरच्या वाडिया पार्क परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हामुळे...