गुन्हेगारीअहिल्यादेवीनगर (अहमदनगर) महापालिकेचा अजब गजब कारभार; पुरेसे स्वच्छता निरीक्षक असतानादेखील कंत्राटी कामगारालाच...

अहिल्यादेवीनगर (अहमदनगर) महापालिकेचा अजब गजब कारभार; पुरेसे स्वच्छता निरीक्षक असतानादेखील कंत्राटी कामगारालाच टाकण्यात आल्या पायघड्या…!

spot_img

अहिल्यादेवीनगर – (अहमदनगर) महापालिकेच्या अजब गजब कारभाराची चीर फाड ‘महासत्ता भारत’ वेब न्युज नेटवर्कनं यापूर्वी अनेक वेळा केलेली आहे. आजदेखील एका महत्त्वाच्या परंतु गंभीर विषयाच्या संदर्भात महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा शाब्दिक खटाटोप आम्ही करत आहोत. तो करण्यापूर्वी अहिल्यादेवीनगर महापालिका प्रशासनाचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न नगरकराच्यावतीनं आम्ही विचारु इच्छितो.

हा प्रश्न विचारण्याचं कारण इतकंच की, या महानगरपालिकेकडे पुरेसे म्हणजे तब्बल 17 स्वच्छता निरीक्षक एस.आय. कायमस्वरूपी शासकीय सेवेत कार्यरत आहेत. मात्र असं असताना देखील बुरुडगाव कचरा डेपोवर या महापालिका प्रशासनानं चक्क कंत्राटी कामगाराला इन्चार्ज आणि स्वच्छता निरीक्षक केलं आहे. हा कंत्राटी कामगार गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिकेच्या हजेरी बुकात सही करत आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रशासक करतील का खुलासा? – पुरेसे स्वच्छता निरीक्षक असताना कंत्राटी कामगाराला पायघड्या नक्की कशासाठी घालण्यात आल्या आहेत? हे सारे कोणाच्या फायद्यासाठी सुरु आहे? या सर्व गंभीर बाबींचा खुलासा या महानगरपालिकेचे प्रशासक असलेले आयुक्त पंकज जावळे करतील का? हा खरा कळीचा मुद्दा आहे.

बुरुडगाव कचरा डेपोला लागलेल्या आगीचा अहवाल कधी येणार? सुमारे एक वर्षांपूर्वी बुरुडगाव परिसरातल्या कचरा डेपोला आग लागली. अर्थात आग लागली होती, की लावण्यात आली, हा मुद्दा वादाचा आणि तितकाच अभ्यासाचा होऊ शकेल. या आगीत खूप सारा कचरा जळून खाक झाला. विशेष म्हणजे या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी या महापालिकेकडे मशनरीदेखील उपलब्ध नाहीत. तरीही ठेकेदाराची कोट्यवधी रुपयांची बिलं अदा करण्यात आली आहे. या कचराडेपोला आग लागल्यानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र त्या समितीचा अहवाल अद्यापपर्यंत आलेला नाही. तो अहवाल कधी येणार याची नगरकरांना आजही प्रतीक्षा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘त्या’ निलेश लंके यांच्या आडून खासदार डॉ. विखेंचा ‘डमी’ खेळ : महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप…!

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या गंमतीशीर घटना घडणार आहेत. त्यापैकीच एक...

गुटख्याची वाहतूक करणारे आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना...

लोकांच्या भावनेशी खेळून मतदान मिळत नाही : खासदार डॉ. विखे याचं टिकास्त्र …!

आम्ही कामं करणारी माणसं आहोत. लोकांना कामं हवी असतात. सोशल मिडियावर व्हिडिओ तयार करून...