राजकारणजिल्ह्यातल्या तरुणांना यापुढे 'जॉब'साठी नगर सोडून जावं लागणार नाही : खासदार डॉ....

जिल्ह्यातल्या तरुणांना यापुढे ‘जॉब’साठी नगर सोडून जावं लागणार नाही : खासदार डॉ. सुजय विखे यांची ग्वाही…!

spot_img

‘अहिल्यानगर (अहमदनगर) शहरासह संपूर्ण दक्षिण लोकसभा मतदारसंघात पाच वर्षांच्या कालखंडामध्ये जी कामं केली, त्या कामांचं प्रगती पुस्तक तुमच्यासमोर आहे. यापुढे तुम्ही ठरवायचंय, की या मतदारसंघाचा विकास कसा करायचा? या पुढील काळात तरुणांना नोकरीसाठी नगर सोडून जावं लागणार नाही. तरुणांसाठी तीन कंपन्यांची निर्मिती केली जाणार असून लवकरच ते काम पूर्णत्वास येणार आहे, अशी ग्वाही या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी दिली.

खासदार डॉ. विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्यासमवेत राहुरी तालुक्यातल्या ताराबाद, म्हैसगाव, कोळेवाडी, शेरी चिकलठाण, दरडगाव थडी या गावांत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.

यावेळी बोलताना माजी मंत्री कर्डिले म्हणाले, की विकास कामाच्या माध्यमातून खासदार विखे यांनी जनतेच्या मनात एक चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. जिल्ह्याच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. तृणाच्या रोजगारासाठी नगर तालुका आणि श्रीगोंदा तालुक्यात औद्योगिक वसाहतीसाठी जागा उपलब्ध देण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे.

अहिल्यानगर मतदार संघातल्या जनतेनंच खा. डॉ. विखे यांना या निवडणुकीत साथ देण्यासाठी मनोमन निर्णय घेतला आहे. डॉ. विखे यांच्या विजयामुळे नरेंद्र मोदी यांचा पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा एकदा महायुतीला साथ द्या, असा आवाहन माजी मंत्री कर्डिले यांनी केलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेअर मार्केटच्या नावाखाली 38 जणांची 1 कोटी 12 लाखांची आर्थिक फसवणूक…!

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाउंट उघडलं आहे, असं सांगून काही दिवस चांगल्या प्रकारे...

विकासात्मक संतुलनाच्या आधारावर नवभारत निर्माण हेच भाजपचे स्वप्न : सुजय विखे यांचं वक्तव्य

भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे....

शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा येणार हर्षद मेहता आणि केतन पारेख ; उद्योगपती हर्ष गोयंका यांनी व्यक्त केलीय भीती…!

शेअर्सच्या किंमतीमध्ये छेडछाड केली जात असून शेअर बाजारात मोठी गडबड होत आहे. यामुळे गुंतवणूकदाराचं...

कर्ज हवंय? अहो, मग आधारकार्डवर मिळतंय ना कर्ज ; काय आहे प्रक्रिया ; घ्या जाणून …!

आधारकार्डवर तुम्हाला काही मिनिटांत पर्सनल लोन मिळू शकतं. त्याची प्रक्रिया काय आहे, त्याविषयी आज...