गुन्हेगारी22 कोटी रुपये घेऊन पळून गेलेल्या शेअर मार्केटच्या 'त्या' बिगबुलच्या घर आणि...

22 कोटी रुपये घेऊन पळून गेलेल्या शेअर मार्केटच्या ‘त्या’ बिगबुलच्या घर आणि कार्यालयाची संतप्त नागरिकांनी केली नासधूस ; शेवगावच्या घोटण परिसरातला आणखी एक जण फरार…!

spot_img

शेअर मार्केटच्या माध्यमातून जास्तीत जास्त कमिशन देण्याचं आमिष दाखवत लोकांच्या कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत सामान्य लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या शेअर मार्केटच्या बिग बुल्सची ‘उलटी गिनती’ सुरु झाली आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या आणि 22 कोटी रुपये घेऊन पळून गेलेल्या एका बिगबुलच्या घर आणि कार्यालयाची संतप्त नागरिकांनी प्रचंड नासधूस केली. दरम्यान, शेवगाव तालुक्यातल्या घोटण परिसरातला आणखी एक जण पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे.

या घटनेमुळे शेवगावमधल्या शेअर मार्केटच्या एजंट मंडळींना मात्र ‘पळता भुई थोडी’ झाली आहे. घर आणि कार्यालयाची एवढी सारी नासधूस होऊनदेखील शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रारच दाखल नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

संतापजनक बाब अशी आहे, की एका स्थानिक पत्रकाराला या व्यवसायातल्या एका भामट्याकडून अप्रत्यक्षपणे धमकी देण्याचा प्रकार घडल्याचीदेखील चर्चा आहे. ‘शेअर मार्केट ऑनलाईन ट्रेडिंगच्या विरोधात बातमी केली तर तुझा बेत पाहू’, अशी धमकी देण्याचा प्रकार घडला असून त्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार आहे.

शेवगाव पोलीस ठाण्याचा गोपनीय विभाग नक्की करतोय तरी काय?

शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेअर मार्केटच्या नावाखाली मोठा नंगानाच सुरु आहे. या व्यवसायात सामान्य लोकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. हे सारं सुरु असताना शेवगाव पोलीस ठाण्याचा गोपनीय विभाग नक्की काय करतो आहे, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नागरदेवळेच्या युवकावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

पुष्कर संतोष शेलार (रा. नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर) हा युवक नागरदेवळे गावातून त्याच्या मित्रासोबत...

कोतवाली पोलिसांच्या कारवाई 1 हजार 150 किलो गोवंशीय गोमांसासह दोन आरोपी जेरबंद…!

'महासत्ता भारत' वेब न्युज / प्रतिनिधी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोवंशीय जनावरांच्या कत्तल कत्तल करून...

अहमदनगर पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार ; मुळा धरणातल्या पाण्याची होतेय प्रचंड नासाडी ; संबंधितांचं अक्षम्य दुर्लक्ष…!

अहमदनगर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये अक्षरशः पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब झाली आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरू...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा; बिअर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली एक लाखाची लाच

‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक,...