राजकारणदूध धंदा करणारे आमदार दुधाच्या कमी भावाबद्दल कधी बोललेत का ? आमदार...

दूध धंदा करणारे आमदार दुधाच्या कमी भावाबद्दल कधी बोललेत का ? आमदार कर्डिलेंचा नामोल्लेख टाळून निलेश लंके यांचा सवाल…!

spot_img

ज्या लोकांनी दहशत आणि गुंडगिरीच्या जोरावर राजकारण केलं त्यांची दहशत जनतेनंच आता मोडून टाकली आहे. या भागातून जनतेने त्यांना तडीपार केलं आहे. पण तेच आता माझ्यावर गुंडगिरीचा आरोप करत आहेत. दुधाचा धंदा करणारे आमदार कधी दुधाला कमी भाव मिळाला म्हणून आवाज उठवतात का, यावर कधी बोलतात का, असा सवाल इंग्लिश माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नाव न घेता उपस्थित केला.

पाथर्डी शेवगाव आणि राहुरी नंतर नगर तालुक्यात निलेश शेळके यांच्या जनसंवाद यात्रेचा कार्यक्रम पार पडला. नगर तालुक्यातल्या डोंगरगण, मांजरसुंबा, पिंपळगाव माळवी, चाफेवाडी, जेऊर, शेंडी, पोखर्डी, बुऱ्हाणनगर, कापूरवाडी, नागरदेवळे, दरेवाडी या भागात निलेश लंके यांचा दौरा पार पडला. यावेळी पहाटे तीन वाजता ते बोलत होते.

या दौऱ्यात महाविकास आघाडीचे गोविंद मोकाटे, रोहिदास कर्डिले, संदीप कर्डिले, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, उद्धवराव दुसुंगे, भाऊसाहेब काळे, राजेंद्र भगत, रामेश्वर निमसे आदींसह नेते यावेळी उपस्थित होते.

लंके पुढे म्हणाले, की विरोधकांनी आरोप करण्यापूर्वी कांद्याचे निर्यात बंदी, शेतमालाला कमी मिळत असलेल्या भाव आणि त्यामुळे शेतकऱ्याला बसत असलेला आर्थिक फटका, दुधाची कमी झालेली बाजार भाव आणि शिक्षण घेऊनदेखील बेरोजगार असलेल्या तरुण पिढीनं यावर बोलले पाहिजे. प्रवरा कारखान्यातल्या 191 कोटी घोटाळ्याच्या संदर्भात तरुणांनी पुढे आलं पाहिजे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लिटिल चॅम्प’ कार्तिकी गायकवाडचा नवरा करतोय ‘हा’ व्यवसाय…!

अगदी बालवयातच गायन कलेत उत्तुंग यश मिळवत भिंगारच्या कार्तिकी गायकवाडनं गायिलेल्या गाण्यातून महाराष्ट्राला वेड...

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...

मोबाईल दिला नाही म्हणून जामखेड तालुक्यातील तरूण मुलाने संपवले जीवन

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण ) जामखेड - सध्या अनेक विद्यार्थी मोबाईल च्या आहारी गेलेले...

नगरच्या जलतरण तलावात पोहणाऱ्यांची होतेय आर्थिक लूट; 50 रुपयांऐवजी शंभर रुपये घेतल्याचा होतोय आरोप…!

अहिल्यानगरच्या वाडिया पार्क परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हामुळे...