लेटेस्ट न्यूज़'बिग रिटर्न्स'च्या आमिषाला अनेक जण बळी पडले ... ! कोट्यवधी रुपये बुडाले...

‘बिग रिटर्न्स’च्या आमिषाला अनेक जण बळी पडले … ! कोट्यवधी रुपये बुडाले …! मात्र तरीही ना दाद ना फिर्याद …!

spot_img

‘त्यांच्या अलिशान, वातानुकूलित ब्रँडेड कार्स, हातात नामांकित कंपन्यांची महागडी घड्याळं, बोटांत सोन्याच्या जाडजूड अंगठ्या, अंगात महागडा थ्री पीस सूट, असं ‘स्टॅंडर्ड’ ‘लिव्हिंग स्टेटस’ असलेल्या तथाकथित गर्भश्रीमंत लोकांनी दिलेल्या जास्तीत जास्त परताव्याच्या (‘बिग रिटर्न्स’) आमिषाला अनेकजण बळी पडले. या आमिषामुळे शेअर मार्केटमध्ये कित्येकांनी कोट्यवधी रुपयांच्या रकमांची गुंतवणूक केली. मात्र ज्यांच्या माध्यमातून ही गुंतवणूक करण्यात आली, ते दलाल काही क्षणांतच परागंदा झाले आहेत.

नगर जिल्ह्यातल्या एकट्या शेवगाव तालुक्यातच हा प्रकार घडलेला नाही. तर संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांत अशी मोठी आर्थिक फसवणूक झालेली आहे. परंतू एवढा सारा पैसा तुमच्याकडे कुठून आला, इन्कम टॅक्स भरला का, कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराचा ताळेबंद तुमच्याकडे आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं उपलब्ध नसल्यानं या अशा मोठ्या आर्थिक फसवणुकीत तक्रारदार पोलिसांसमोर येऊन तक्रार देण्याच्या मानसिकतेत नसल्याचं सध्या पाहायला मिळत आहे.

नगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यात तीन ते चार जणांनी शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या रकमा घेतल्या आहेत. या रकमांच्या बदल्यात संबंधितांना जास्तीत जास्त म्हणजे 7 ते 28 टक्क्यांपर्यंत दर महिन्याला परतावा देण्याचं आमिष या लोकांनी दाखवलं होतं. मात्र चार ते पाच दिवसांपासून ही मंडळी शेवगावमधून पळून गेली आहेत. विशेष म्हणजे लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी या महाभागांनी वातानुकूलित अशी कार्यालयेदेखील थाटली होती.

वास्तविक पाहता ज्यावेळी एखाद्याला लाखो रुपयांची गुंतवणूक करायची असते, ती गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधितांनी चार्टर्ड अकाउंटशी चर्चा करणं क्रमप्राप्त ठरतं. कारण चार्टर्ड अकाउंटंट्सना याविषयी सखोल माहिती असते. परंतू जास्तीत जास्त परतावा मिळणार, या आमिषाला बळी पडून अनेक जण अधिक चौकशी न करता मोठ्या रकमा गुंतवितात आणि आर्थिक फसवणूक झाल्यानंतर पोलीस यंत्रणेकडे धाव घेतात.

अशा मोठमोठ्या रकमा गुंतविणारे दलाल प्रचंड बुद्धिमान असतात. त्यांच्या मधाळ बोलण्याला आणि राहणीमानाला सामान्य माणूस भारावून जातो. हे दलाल अनेक प्रकारची उदाहरणं देऊन संबंधित माणसाला त्याच्या गरीबीची जाणीव करुन देऊन त्याला एकप्रकारे ‘इमोशनल ब्लॅकमेल’ करत असतात. यापुढे भविष्यात आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधितांनी व्यवस्थितपणे चौकशी करूनच त्या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यायला हवा. जेणेकरून भविष्यात कोणाचीही आर्थिक फसवणूक होणार नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘यूट्युबर्स’ कराळे मास्तर यांनी केली नीच पातळीवरची टिका…!

नरेंद्र दामोदरदास मोदी. हे पंतप्रधानपदाच्या माध्यमातून 140 कोटी भारतियांचं जगभरात प्रतिनिधित्व करत आहेत. अर्थात...

नागरदेवळेच्या युवकावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

पुष्कर संतोष शेलार (रा. नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर) हा युवक नागरदेवळे गावातून त्याच्या मित्रासोबत...

कोतवाली पोलिसांच्या कारवाई 1 हजार 150 किलो गोवंशीय गोमांसासह दोन आरोपी जेरबंद…!

'महासत्ता भारत' वेब न्युज / प्रतिनिधी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोवंशीय जनावरांच्या कत्तल कत्तल करून...

अहमदनगर पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार ; मुळा धरणातल्या पाण्याची होतेय प्रचंड नासाडी ; संबंधितांचं अक्षम्य दुर्लक्ष…!

अहमदनगर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये अक्षरशः पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब झाली आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरू...