राजकारणईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर लोकसभेची निवडणूक घ्या ... तरच मतदान केंद्राध्यक्षाची ड्युटी करीन...

ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर लोकसभेची निवडणूक घ्या … तरच मतदान केंद्राध्यक्षाची ड्युटी करीन : ‘या’ प्राध्यापकानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दिलं पत्र…!

spot_img

ईव्हीएम प्रणाली भारताच्या लोकशाहीसाठी घातक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते ईव्हीएमच्या विरोधात बोलत होते. ज्या प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएमचा शोध लावला, ते राष्ट्रसुद्धा निपक्षपणे निवडणूक पार पाडण्यासाठी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूका घेत आहे. बँक खाते जसं हॅक केलं जातं, तसं ईव्हीएमसुद्धा हे केलं जाऊ शकतं. म्हणून ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर लोकसभेची निवडणूक घेतली तरच मी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून ड्युटी करीन, असं पत्र एका प्राध्यापकानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दिलं आहे.

यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सागर शेवंतराव जाधव यांनी ही पत्र दिलं आहे. या पत्रात ते म्हणताहेत, की जगातल्या सर्वात महान लोकशाही राष्ट्राच्या निवडणूक महोत्सवात सहभागी होऊनही कोणत्याही भारतीय नागरिकासाठी गौरवाची बाब आहे. मला ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल शासनाचे जाहीर आभार. 2004 पासून मी मतदान केंद्राध्यक्ष ही ड्युटी करत आहे. मात्र देशभरात ईव्हीएमच्या विरोधात वातावरण तयार झालं आहे. ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुका भारतीय लोकशाहीसाठी विश्वासार्ह नाहीत. भारताचा एक नागरिक म्हणून, लोकशाहीच्या संरक्षणासाठी भारतीय संविधान अनुच्छेद १९ (१) (अ) द्वारे ईव्हीएमच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास असहमती नोंदवित असल्याचे त्यांनी प्रशासनास कळविले. मात्र ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर ही मतदान प्रक्रिया घेत असल्यास आपण सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यास तयार असल्याचं डॉ. सागर जाधव यांनी स्पष्ट केलंय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

93 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोने आणि रोख रक्कम जप्त ; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राज्य निवडणूक आयोग तसंच जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी घालून दिलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या...

‘पुण्य कर्माच्या मोबदल्यात स्वर्गप्राप्ती करुन देतो’, असं सांगून एका डॉक्टरला चक्क 5 कोटी 38 लाखांना लुटलं…!

धर्म, पाप, पुण्य या सर्व गोष्टी फक्त गरिबांनाच प्रभावित करतात, असं नाही. तर व्यवसायानं...