गुन्हेगारीपुण्याच्या येरवड्यात हे काय घडलंय भलतंच ; वाचल्यानंतर तुम्हीही चक्रावून जाल...!

पुण्याच्या येरवड्यात हे काय घडलंय भलतंच ; वाचल्यानंतर तुम्हीही चक्रावून जाल…!

spot_img

एकेकाळी विद्येचं माहेरघर असलेलं पुणे आता गुन्हेगारांचा अड्डा होतो की काय, अशी भीती पुणेकरांच्या मनात निर्माण झाली आहे. यापूर्वी मुंबई ही  गुन्हेगारांची कर्मभूमी होती. पण आता पुणे गुन्हेगारांचा अड्डा होऊ पाहतो आहे. तुम्ही म्हणाल, हे असं पुण्याबद्दल बोलणं योग्य आहे का ? पण त्या मागच्या कारणही तसंच आहे. शेवटपर्यंत वाचा आणि जाणून घ्या, काय झालंय पुण्यातल्या येरवड्या…!

गेल्या काही महिन्यांपूर्वी पुण्यात शरद मोहोळ यांची हत्या झाली होती. मात्र त्यानंतर आता आणखी एक मोठी घटना घडली आहे. पुण्यातल्या येरवडा कारागृहात ड्युटीवर असलेल्या शेरखान पठाण नावाच्या अधिकाऱ्याला कुख्यात आंदेकर टोळीतल्या सदस्यांनी बेदम मारहाण केली. अगदी क्षुल्लक कारणावरून ही मारहाण झाल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित टोळीतल्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या गुरुवारी (दि. 11) ही खळबळजनक घटना घडली. येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेले आंदेकर टोळीचे सदस्य विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे या दोघांनी येरवडा कारागृहातल्या शेरखान पठाण नावाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीत पठाण यांच्या उजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली असून त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. आता या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या गुन्हेगारीचा बिमोड कसा करायचा, हा मोठा गंभीर प्रश्न पोलिसांसमोर ‘आ’ वासून उभा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी नगरमध्ये सभा ; योगी आदित्यनाथ यांच्या सभेनं होणार प्रचाराची सांगता…!

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची...

उमेदवारी नाकारल्याने खा. राजेंद्र गावित नाराज.. सहज जिंकू शकलो असतो असा दावा; नाराज असलो, तरी महायुतीचेच काम करणार!

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघ कोणाच्याही वाट्याला गेला, तरी राजेंद्र गावित हेच उमेदवार असतील असे...

बुलढाणा ठरला राज्यातील पहिला ‘डीजे’मुक्त जिल्हा!! – जिल्ह्याचे ‘सिंघम’ पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांनी करून दाखवले!

विनापरवाना डीजेंवर कारवायांचा धडाका; आतापर्यंत 51 डीजेचालकांवर उगारला कारवाईचा बडगा – ‘मालेगाव पॅटर्न’नंतर आता एसपी...

इकडं खासदार लोखंडे भेटत नाहीत आणि तिकडं खासदार विखे भेटत नाहीत ; मग काय फायदा या लोकप्रतिनिधींचा? मतदारांमध्ये पसरलीय कमालीची संभ्रमावस्था…!

लोकसभेची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. खरं तर या निवडणुकीमध्ये देशपातळीवरच्या मुद्द्यांवर चर्चा...