गुन्हेगारी'पुण्य कर्माच्या मोबदल्यात स्वर्गप्राप्ती करुन देतो', असं सांगून एका डॉक्टरला चक्क 5...

‘पुण्य कर्माच्या मोबदल्यात स्वर्गप्राप्ती करुन देतो’, असं सांगून एका डॉक्टरला चक्क 5 कोटी 38 लाखांना लुटलं…!

spot_img

धर्म, पाप, पुण्य या सर्व गोष्टी फक्त गरिबांनाच प्रभावित करतात, असं नाही. तर व्यवसायानं डॉक्टर असलेल्या व्यक्तीलासुद्धा याचा प्रभाव वाटू लागतो. पुण्यातल्या कोंढवा परिसरात एका डॉक्टरला काही संधीसाधू आणि भोंदू लोकांनी पुण्य कर्माद्वारे स्वर्गप्राप्ती करून देतो, असं सांगून 5 कोटी 38 लाख रुपयांना गंडवलं आहे.

याप्रकरणी डॉ. अहमद अली इनाम अली कुरेशी (रा. मेफेयर एलिगंझा, एन. आय. बी. एम. रोड कोंढवा, पुणे) यांनी फिर्याद दिली. डॉक्टर कुरेशी आणि सादिक अब्दुल मजीद शेख, यास्मिन सादिक शेख, एतेशाम सादिक शेख (रा. हार्मनी सोसायटी, कोंढवा, बिबवेवाडी रोड, गुलटेकडी, पुणे) आणि राज आढाव उर्फ नरसू यांचा एकमेकांशी परिचय होता.

आरोपी सादिक शेख, त्याची पत्नी यास्मिन आणि इतरांनी डॉक्टर कुरेश यांच्याशी गोड गोड बोलून धर्म, पाप, पुण्य आणि स्वर्गप्राप्ती याविषयी डॉ. कुरेशी यांना सांगून त्यांचा ‘ब्रेन वॉश’ केला. डॉ. कुरेश यांच्या वेगवेगळ्या मालमत्तांची 11 बक्षीसपत्रं तयार करून ही मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील हे पुढील तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

उमेदवारी नाकारल्याने खा. राजेंद्र गावित नाराज.. सहज जिंकू शकलो असतो असा दावा; नाराज असलो, तरी महायुतीचेच काम करणार!

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघ कोणाच्याही वाट्याला गेला, तरी राजेंद्र गावित हेच उमेदवार असतील असे...

बुलढाणा ठरला राज्यातील पहिला ‘डीजे’मुक्त जिल्हा!! – जिल्ह्याचे ‘सिंघम’ पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांनी करून दाखवले!

विनापरवाना डीजेंवर कारवायांचा धडाका; आतापर्यंत 51 डीजेचालकांवर उगारला कारवाईचा बडगा – ‘मालेगाव पॅटर्न’नंतर आता एसपी...

इकडं खासदार लोखंडे भेटत नाहीत आणि तिकडं खासदार विखे भेटत नाहीत ; मग काय फायदा या लोकप्रतिनिधींचा? मतदारांमध्ये पसरलीय कमालीची संभ्रमावस्था…!

लोकसभेची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. खरं तर या निवडणुकीमध्ये देशपातळीवरच्या मुद्द्यांवर चर्चा...

माजी आमदार विजय औटी गेले तरी निलेश लंकेंचा दबदबा कायम ; डॉ. सुजय विखेंची ही खेळी परतवून लावण्यासाठी लंकेंनी टाकला डाव…!

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदारकीच्या निवडणुकीचा 'हाय व्होल्टेज ड्रामा' सध्या पहायला मिळत आहे. पारनेरळमचे...