गुन्हेगारी93 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोने आणि रोख रक्कम जप्त ;...

93 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोने आणि रोख रक्कम जप्त ; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

spot_img

राज्य निवडणूक आयोग तसंच जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी घालून दिलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कोणत्याही इसमाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त अधिक रक्कम जवळ बाळगता येत नाही. 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळून आल्यास जिल्हाधिकारी आणि निवडणुक आयोग यांना सुचित करावं लागतं, याबाबत तसे आदेश आहेत.

दरम्यान, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, रमेशसिंह हेरसिंह राजपूत (रा. राजस्थान) हा कोणतंही अधिकृत बील नसतांना त्याच्या कब्जामध्ये सोन्याचे दागिने बाळगून ते विक्री करण्याकरीता त्याच्या एका साथीदारासह अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यामध्ये आला असून ते सध्या (तुलसी विहार लॉजिंग, माणिकचौक, अहमदनगर) येथे थांबलेला आहे.

या बातमीची हकिगत पोनि. दिनेश आहेर (स्थानिक गुन्हे, शाखा अहमदनगर) यांना कळविली असता त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि तुषार धाकराव, मनोहर शेजवळ, रविंद्र कर्डिले, शिवाजी ढाकणे, रविंद्र घुंगासे, संतोष खैरे, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करुन बातमीतल्या ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करुन पथकाला रवाना केलं.

वरील पोलीस पथकातल्या अधिकारी
आणि पोलीस अंमलदार यांनी तुलसी विहार लॉजिंग (माणिक चौक, अहमदनगर) येथे जाऊन खात्री केली असता सदर लॉजमध्ये रमेशसिंह हेरसिंह राजपूत (वय 47 वर्षे, रा. बायोसा गल्ली, बेडा, बेरा, पाली, राजस्थान), नारायणलाल हेमराज गाडरी (वय – 27 वर्षे, रा. गाडरी मोहल्ला, धना की, भागल, ताना, चित्तौडगढ, आकोला, राजस्थान) असे सोन्याचे विविध दागदागिने व रोख रकमेसह मिळून आले.

रमेशसिंह हेरसिंह राजपूत याच्या कब्जामध्ये 91 लाख 78 हजार 897/- रुपये किंमतीचे 1311.28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने तसेच 3 लाख 47 हजार रुपये रोख रक्कम आणि नारायणलाल हेमराज गाडरी याच्या कब्जामध्ये 1 लाख 36 हजार 500 रुपये किंमतीचे 19.500 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे या दोन्ही इसमांकडे एकूण 93 लाख 15 हजार 397 रुपये किंमतीचे 1330.78 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 34 हजार 700 रुपये रोख रक्कम असा एकूण 93 लाख 50 हजार 097 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.

या दोन्ही इसमांकडे त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या दागिण्यांचे अधिकृत बिलाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्याकडे कोणतंही अधिकृत बिले सोबत नसल्याचं सांगितलं. सदरचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पंचनामा करुन ताब्यात घेण्यात आली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या सोन्याचे दागिने आणि रोख रकमेबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अहमदनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर आणि उपायुक्त आयकर विभाग अहमदनगर यांना पुढील कार्यवाही होणेबाबत विनंती करण्यात आली आहे.

सदर कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी नगरमध्ये सभा ; योगी आदित्यनाथ यांच्या सभेनं होणार प्रचाराची सांगता…!

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची...

उमेदवारी नाकारल्याने खा. राजेंद्र गावित नाराज.. सहज जिंकू शकलो असतो असा दावा; नाराज असलो, तरी महायुतीचेच काम करणार!

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघ कोणाच्याही वाट्याला गेला, तरी राजेंद्र गावित हेच उमेदवार असतील असे...

बुलढाणा ठरला राज्यातील पहिला ‘डीजे’मुक्त जिल्हा!! – जिल्ह्याचे ‘सिंघम’ पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांनी करून दाखवले!

विनापरवाना डीजेंवर कारवायांचा धडाका; आतापर्यंत 51 डीजेचालकांवर उगारला कारवाईचा बडगा – ‘मालेगाव पॅटर्न’नंतर आता एसपी...

इकडं खासदार लोखंडे भेटत नाहीत आणि तिकडं खासदार विखे भेटत नाहीत ; मग काय फायदा या लोकप्रतिनिधींचा? मतदारांमध्ये पसरलीय कमालीची संभ्रमावस्था…!

लोकसभेची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. खरं तर या निवडणुकीमध्ये देशपातळीवरच्या मुद्द्यांवर चर्चा...