राजकारणपंतप्रधान नरेंद्र मोदी ही देशाची महाशक्ती ; ऊन्हाची पर्वा न करता त्यांचे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ही देशाची महाशक्ती ; ऊन्हाची पर्वा न करता त्यांचे हात बळकट करा : आमदार संग्राम जगताप यांचं आवाहन…!

spot_img

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ अहिल्यानगरच्या (अहमदनगर) संत निरंकारी भवन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपस्थित असलेल्या लाखो मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी ही देशाची महाशक्ती आहे. त्यामुळे या निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे आणि उत्तर नगर लोकसभा मतदारसंघातून सदाशिव लोखंडे यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देत पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करा’.

आमदार जगताप म्हणाले, ‘निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होतच असतात. त्याकडे लक्ष न देता आपल्या देशाचा जवान जसं ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर सतत पहारा देत असतो, त्या जवानाच्या धैर्याची मनात आठवण ठेवून आपल्याला उन्हाचा किती त्रास झाला तरी आपण या निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येनं मतदान करा आणि देशाच्या महाशक्तीचे हात बळकट करा’.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉक्टर सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...