शेअर मार्केटशेअर मार्केटच्या नावाखाली 38 जणांची 1 कोटी 12 लाखांची आर्थिक फसवणूक...!

शेअर मार्केटच्या नावाखाली 38 जणांची 1 कोटी 12 लाखांची आर्थिक फसवणूक…!

spot_img

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाउंट उघडलं आहे, असं सांगून काही दिवस चांगल्या प्रकारे ‘रिटर्न्स’ देत दोघांनी संबंधितांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मात्र कुठलाही ‘रिटर्न्स’ आणि गुंतवलेली रक्कम परत न देता 38 जणांची तब्बल एक कोटी 12 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

प्रशांत सिताराम खाडे आणि सिताराम खाडे या पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सुहास बजरंग शेजवळ (रा. तानाजीनगर, पिंपरी चिंचवड, पुणे) यांनी फिर्याद दिली.

आरोपी प्रशांत आणि त्याचे वडील सिताराम या दोघांनी संगनमत करुन फिर्यादी आणि त्यांचे सहकारी मित्र अशा 37 लोकांचा विश्वास संपादन केला. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यासाठी तुमच्या सर्वांचे ‘डिमॅट’ अकाउंट उघडलं असल्याचं आरोपींनी सांगितलं. आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फिर्यादीकडून दहा लाख 38 हजार तर इतर 37 जणांकडून 1 कोटी 1 लाख 90 हजार असे एकूण एक कोटी बारा लाख 28 हजार रुपये चेकद्वारे घेतले.

मोठ्या रकमेची गुंतवणूक केल्यानंतर आरोपींनी ‘रिटर्न्स’ देणं बंद केलं. ‘डिमॅट’ अकाउंट उघडल्याचं एलकेपी कंपनीचं खोटं प्रमाणपत्रंसुद्धा आरोपींनी फिर्यादीला दिलं. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करावी – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करावी – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मुंबई,...

पुण्यातील नवले पुलावर पहाटे भीषण अपघात, कारची बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चार जखमी

पुण्यातील नवले पुलावर पहाटे भीषण अपघात, कारची बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चार जखमी पुणे:...

ब्रेकिंग – जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांचा राष्ट्रपती पदकाने देशपातळीवर सन्मान

जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांचा राष्ट्रपती पदकाने देशपातळीवर सन्मान... PSI राजेंद्र वाघ...

तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने… महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध! महिलांच्या सन्मानासाठी तटकरे यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळणे...

तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने... महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध! महिलांच्या...