ब्रेकिंगवडाळा मिशनच्या 'त्या' दवाखान्यात शेकडो महिलांची हेळसांड ; कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर संबंधित...

वडाळा मिशनच्या ‘त्या’ दवाखान्यात शेकडो महिलांची हेळसांड ; कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर संबंधित डॉक्टरांनी महिलांना धोकादायक अवस्थेतच दिलं सोडून ; उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची ऋषिकेश शेटे पाटील यांची मागणी…!

spot_img

नेवासे तालुक्यातल्या वडाळा बहीरोबा परिसरात असलेल्या मिशनरीच्या दवाखान्यात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संबंधित डॉक्टरांकडून माणुसकीला काळिमा फासल्याचं कृत्य उघडकीस आलं आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांना या संदर्भात काल (दि. १९) रात्री साडेदहा वाजता फोन आल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्या दवाखान्यात जाऊन संबंधित महिलांची भेट घेतली.

दरम्यान, या प्रकरणी ऋषिकेश शेटे पाटील यांनी नेवाशाचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना फोन करून घटनास्थळी बोलवून घेतले. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर या महिलांना डॉक्टरांनी उघड्यावरच सोडून दिलं. अनेक महिलांची भूल उतरण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना जमिनीवर झोपवलं. त्याठिकाणी वीज पुरवठा बंद असल्यानं रात्री सगळीकडे अंधार होता. पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा नव्हती, असा आरोप संबंधित महिलांनी केला.

अशा प्रकारचे बेजबाबदार वर्तन करणाऱ्या डॉक्टरांविषयी जिल्हाधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांच्याकडे तक्रार करणार असून या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करा आणि सर्वच संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे उद्या (दि. २२) करणार असल्याचं ऋषिकेश शेटे पाटील यांनी सांगितलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तुमच्या नातवाला अभिमान वाटेल असं काम करा : असं का म्हणाले असतील भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे?

'येणाऱ्या 2047 मध्ये तुमच्या घरातला अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नातू ज्यावेळेस तुम्हाला विचारील, 'बाबा...

शरद पवार तर वस्ताद आणि वस्ताद एक डाव राखून ठेवतोच ; कोणाच्याही दहशतीला बळी पडू नका : आमदार रोहित पवार यांचं आवाहन

'महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक पैलवान आहेत. त्या पैलवानांचा एक वस्ताद असतो. हा वस्ताद नेहमी एक...

देशात सर्व धर्मांचं ऐक्य टिकायला हवं : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वक्तव्य

'या देशाला शांतीचा संदेश महात्मा गांधींनी दिला, अहमदनगरच्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषींनी दिला. अहमदनगर (अहिल्यानगर)...