लेटेस्ट न्यूज़नवीदिल्लीत 'पुढचे पाऊल' व 'युवा स्पूर्ती प्रतिष्ठान' आयोजित गुढीपाडवा गाठभेट कार्यक्रम उत्साहात...

नवीदिल्लीत ‘पुढचे पाऊल’ व ‘युवा स्पूर्ती प्रतिष्ठान’ आयोजित गुढीपाडवा गाठभेट कार्यक्रम उत्साहात …!

spot_img

देशाची राजधानी नवीदिल्लीतल्या संसद मार्ग परिसरात असलेल्या ‘द कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया’ याठिकाणी काल (दि. २६) संध्याकाळी साडेपाच वाजता एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत सरकारच्या माजी सचिव डॉ. अरुणा शर्मा होत्या. नवीदिल्लीत शासकीय सेवेनिमित्त रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचं स्वागत, उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकाऱ्यांचा गौरव आणि नवीदिल्लीतून बदली झालेल्या त्याचप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार असं या कार्यक्रमाचे स्वरुप होतं.

यावेळी सेवानिवृत्त अधिकारी एस. एन. घोरमाडे आणि अतुल चंद्र कुलकर्णी यांनी अनुभव कथन केलं. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना आलेले अनुभव त्यांनी खूप व्यवस्थितपणे मांडले. युवा स्फूर्ती प्रतिष्ठान आणि ‘पुढचे पाऊल’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यावतीनंयुवा स्फूर्तीचे संस्थापक अध्यक्ष निरंजन निर्मळ यांचा सत्कार करण्यात आला.

नवीदिल्लीमध्ये युवा स्फूर्तीतर्फे असे कार्यक्रम नेहमीच घेण्यात येतात. महाराष्ट्रातल्या लोकांचं नवीदिल्लीत असणारं काम यानिमित्तानं होतं. नवीदिल्लीमध्ये कोणाला काही अडचण आल्यास प्रतिष्ठानच्यावतीनं आणि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अडचणी सोडविण्यासाठी ण्याचा प्रयत्न केला जातो.

या कार्यक्रमास डॉक्टर तनुजा, मनोज नेसरी, सुगंध चौगुले, प्रतिभा पारकर, आनंद पाटील, अय्यास तांबोळी, विनायक पाटील, चिन्मय गोटमारे, प्रवीण मेश्राम, डॉ. सुयश चव्हाण, वेल्हारी गायकवाड, संदीप कोटे, शांतेश्वर खैरनार, स्वप्निल थोरात, अरविंद ढोके, अजय अक्षी आदी यावेळी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुंबईत बॉलीवुड अभिनेत्री करिष्मा कपूर यांच्या हस्ते होणार डॉ.भाऊसाहेब शिंदे चा सन्मान

अहमदनगर : युवा समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तज्ञ बुध्दीमान म्हणूण ओळखले...

लिटिल चॅम्प’ कार्तिकी गायकवाडचा नवरा करतोय ‘हा’ व्यवसाय…!

अगदी बालवयातच गायन कलेत उत्तुंग यश मिळवत भिंगारच्या कार्तिकी गायकवाडनं गायिलेल्या गाण्यातून महाराष्ट्राला वेड...

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...

मोबाईल दिला नाही म्हणून जामखेड तालुक्यातील तरूण मुलाने संपवले जीवन

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण ) जामखेड - सध्या अनेक विद्यार्थी मोबाईल च्या आहारी गेलेले...