ब्रेकिंगनगर 'आरटीओ' ला सहआरोपी करा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; संतप्त...

नगर ‘आरटीओ’ ला सहआरोपी करा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; संतप्त नगरकरांची मागणी

spot_img

नगर आरटीओचा बेजबाबदार कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. शहर आणि परिसरात विनानंबरचे अनेक डंपर्स भरधाव वेगानं धावत आहेत. शहरातल्या वसंत टेकडी भागात काल (दि. २७) यापैकीच एका डंपरने दोघांचा बळी घेतला. नगर आरटीओच्या भरारी पथकाला असे डंपर्स का दिसत नाहीत? या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांचे डोळे फुटले आहेत का, असा सवाल उपस्थित करत या अपघातप्रकरणी नगर ‘आरटीओ’ला सहआरोपी करा आणि भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी संतप्त नगरकरांमधून केली जात आहे.

नगर शहर आणि परिसरात असे अनेक डंपर्स अवैध वाळू वाहतुकीचा व्यवसाय करत आहेत. हे डंपर्स भरधाव वेगाने पळवले जाताहेत. यापूर्वी अनेकांचा या डंपर्समुळे जीव गेलेला आहे. कालचा अपघातसुद्धा अशातलाच प्रकार आहे.

नगर आरटीओच्या भरारी पथकासह या विभागाच्या काही अधिकाऱ्यांचे आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांचे आर्थिक लागेबांधे आहेत की काय, अशी शंका या निमित्तानं व्यक्त केली जात आहे.

प्रशासन आणखी किती लोकांचा बळी जाण्याची वाट पाहत आहे, असा देखील प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. नगर शहरातून अनेक महामार्ग जात आहेत. यापैकी नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या वसंत टेकडी चौकात भीषण अपघात झाला आणि दोघांचा जीव गेला. अशा अपघातांचं गांभीर्य प्रशासनाला कधी कळणार, हादेखील मोठा प्रश्नच आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरच्या प्रदूषण महामंडळातल्या ‘या’ मस्तवाल अधिकाऱ्यानं केलाय बेजबाबदारपणाचा कळस; त्रस्त नागरिकांचा गंभीर आरोप…!

नगरच्या प्रदूषण नियंत्रण महामंडळातल्या कार्यालयात उपप्रादेशिक अधिकारी या पदावर असलेल्या चंद्रकांत शिंदे नावाच्या अधिकाऱ्यानं...

ओव्हरलोड गाड्यांची पासींग करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी आरटीओ एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल…!

ओव्हरलोडच्या तीन गाड्यांची पासिंग करण्यासाठी अशरफ खान आणि अरफान खान या आरटीओ एजंटांनी 41...

नगरची एमआयडीसी लवकरच घेणार मोकळा श्वास ; पोलीस बंदोबस्तात हटविली जाणार अतिक्रमणं : कार्यकारी अभियंता संदीप बडगे यांची माहिती …!

नगरच्या एमआयडीसी परिसरात झालेली अतिक्रमणं हा विषय उद्योजकांसह सर्वांचीच डोकेदुखी बनला आहे. टपऱ्या, हातगाड्या,...

मे महिन्यात कोणत्या कारला मिळालीय ग्राहकांची पसंती ; घ्या जाणून…!

नवी कोरी कार विकत घेऊन त्या कारमधून 'लॉंग ड्राईव्ह' करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र...