राजकारणखा. सदाशिव लोखंडे यांचा फॉर्म भरल्याच्या चर्चेऐवजी रंगली भलतीच चर्चा...!

खा. सदाशिव लोखंडे यांचा फॉर्म भरल्याच्या चर्चेऐवजी रंगली भलतीच चर्चा…!

spot_img

अहिल्यानगर उत्तर लोकसभा मतदार संघात (शिर्डी) विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज (दि. २२) उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विधान परिषदेचे अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद झाली. मात्र या पत्रकार परिषदेत राजू वाघमारे हे नेते चक्क झोपल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या चर्चेपेक्षा नेते वाघमारे हे पत्रकार परिषदेत झोपल्याचीच चर्चा जास्त रंगली.

डॉ. नीलम गोऱ्हे या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधत होत्या. तेवढ्यात त्यांच्याशेजारी नेते वाघमारे हे झोपी गेल्याचं सर्वच उपस्थितांच्या लक्षात आलं. बराच वेळ हे सुरू होतं. अखेर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वाघमारे यांना हलवून उठविल्यानंतर ते खडबडून जागे झाले.

वातावरणातला उष्मा आणि एसीची थंडाई…!

दरम्यान, आज तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता. प्रचंड कडक ऊन पडल्यानं अनेकजण घामाघूम झाले होते. मात्र डॉ. नीलम गोऱ्हे यांची जिथं पत्रकार परिषद सुरू होती, तिथं एसीमुळे थंड हवा होती. त्याचा परिणाम असा झाला, की नेते राजू वाघमारे यांना भर पत्रकार परिषदेत चांगलीच झोप लागली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वंचित’च्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या अडचणींत वाढ ; प्रचारात अल्पवयीन मुलाचा वापर केल्यानं होणार गुन्हा दाखल…!

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्यानं नगर उत्तर लोकसभा मतदारसंघातल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार...

वडेट्टीवार, अजमल कसाबच्या कुटुंबियांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्या : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य …!

'स्वार्थी राजकारणासाठी काही नेते इतक्या नीच पातळीला जात आहेत, की ते देशाशी गद्दारी करत...

तुमच्या नातवाला अभिमान वाटेल असं काम करा : असं का म्हणाले असतील भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे?

'येणाऱ्या 2047 मध्ये तुमच्या घरातला अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नातू ज्यावेळेस तुम्हाला विचारील, 'बाबा...

शरद पवार तर वस्ताद आणि वस्ताद एक डाव राखून ठेवतोच ; कोणाच्याही दहशतीला बळी पडू नका : आमदार रोहित पवार यांचं आवाहन

'महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक पैलवान आहेत. त्या पैलवानांचा एक वस्ताद असतो. हा वस्ताद नेहमी एक...