शैक्षणिककॅ.विनीत मुकणे यांना स्वातंत्र्यदूत पुरस्कार जाहीर.. श्रमजीवी संघटनेच्या वतीने निवड..!...

कॅ.विनीत मुकणे यांना स्वातंत्र्यदूत पुरस्कार जाहीर.. श्रमजीवी संघटनेच्या वतीने निवड..! एक मे रोजी होणार पुरस्काराचे वितरण;

spot_img

पालघरः श्रमजीवी संघटनेच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्यदूत या पुरस्कारासाठी या वेळी सामाजिक कार्यकर्ते कॅप्टन विनीत मुकणे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेने राज्यात सामाजिक आणि अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्याचे ठरवले आहे. राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुकणे यांनी केलेले काम लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ नितीन प्रधान, ज्येष्ठ सनदी अधिकारी गौतम चटर्जी, ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. उसगाव येथील साने गुरुजी प्रशिक्षण संकुलात एक तारखेला सकाळी दहा वाजता या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिली.

श्रमिक, कष्टकऱ्यांसाठी केलेल्या कामाची दखल
श्रमजीवी संघटनेचा स्वातंत्र्यदूत हा पुरस्कार विवेक पंडित यांच्या उपस्थितीत मिळणार असून हा पुरस्कार ही जाणीव आहे. गरीब, कष्टकरी, आदिवासी, शोषित आणि पीडित समाजासाठी केलेल्या कामाची दखल म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे. याबाबत मुकणे म्हणाले, की भारताला स्वातंत्र्य मिळावे, म्हणून अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. स्वातंत्र्य मिळवून दिले. अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी जसे प्रयत्न केले, तसे प्रयत्न भारतातही झाले.

मूलभूत अधिकारांसाठी लढा
भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले असले, तरी अद्यापही राज्यघटनेच्या कलम १९ पासून कलम ३२ पर्यंतचे मूलभूत अधिकार अजून सामान्यांच्या उंबरठ्यापर्यंत गेले आहेत, की नाही हा मोठा प्रश्न आहे. लोकांना सन्मानाने जगण्याचा, मूलभूत शिक्षणाचा, अन्न, वस्त्र आणि आरोग्याचा असे अनेक मूलभूत अधिकार घटनेने दिले आहेत; परंतु या अधिकारांचे पालन होते का, शासन या पातळीवर काय करते, याबाबत लोकांमध्ये जाणीव, जागृती करणे आणि त्यांना ते अधिकार मिळवून देणे, यावर आपला भर आहे.

श्रमजीवी’ची ऊर्जा
श्रमजीवी ही संघटना राज्य पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबवत असते. विशेषतः कामगार, आदिवासींसाठी ही संघटना मोठे काम करते. त्यांचेच काम पुढे नेण्यासाठी मला हा स्वातंत्र्यदूत पुरस्कार देण्यात आला असून, या पुरस्काराने आणखी काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे, अशी भावना कॅप्टन विनीत मुकणे यांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाच मागितली एक कोटीची, तडजोडीअंती द्यायचे ठरले 30 लाख ; पण घात झाला, पाच लाख घेताना अँटी करप्शन विभागानं एकाला घेतलं ताब्यात …!

आपल्या देशातल्या प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये 'लाच घेणं आणि लाच देणं गुन्हा आहे', अशी स्टिकर्स...

पोलीस, एस. आर. पी. एफ. आणि केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान अशी आहे तिहेरी ‘स्ट्राँग’ सुरक्षा ; कुठं? अहो, वाचा की मग सविस्तर…!

लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी नगर आणि शिर्डी मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर...

शिस्तबद्ध अशा पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची बारकाईनं काळजी घ्या : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या सूचना…!

आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. जगातला सर्वात शिस्तबद्ध असा हा पालखी...

कांद्याची निर्यात 35 टक्क्यांनी वाढली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी कांद्याच्या प्रश्नावर काहीच बोलत नाही, यावरुन मध्यंतरी मोठी नाराजी पसरली होती....