राजकारणबहुजन विकास आघाडीला मतदारसंघ सोडल्यास शिवसेना-भाजपचे नुकसान.. खासदार गावित यांच...

बहुजन विकास आघाडीला मतदारसंघ सोडल्यास शिवसेना-भाजपचे नुकसान.. खासदार गावित यांच वक्तव्य: उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा;

spot_img

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघात ‘परभणी पॅटर्न’ वापरून हा मतदारसंघ बहुजन विकास आघाडीला सोडणार नाहीत; परंतु हा मतदारसंघ जर ‘परभणी पॅटर्न’ प्रमाणे बहुजन विकास आघाडीला सोडला, तर शिवसेना भारतीय जनता पक्षाचे प्रचंड नुकसान होईल, असा इशारा खासदार राजेंद्र गावित यांनी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा करून मतदारसंघात एक फेरी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.

पालघर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने भारती कामडी यांना उमेदवारी दिली आहे; परंतु महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाही. महायुतीत हा मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाणार, हेही अद्याप निश्चित नाही. अशा पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीने बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यातच राज्य सरकारला बहुजन विकास आघाडीने यापूर्वी वारंवार सहकार्य केले असल्यामुळे हा मतदारसंघ बहुजन विकास आघाडीला सोडावा अशी चर्चा सुरू झाली आहे.

परभणी पॅटर्न’ पालघरमध्ये नाही
याबाबत खासदार गावित म्हणाले, की महायुती हा राष्ट्रीय पक्ष आहे. अशा वेळी पालघर जिल्ह्यापुरत्या मर्यादित असलेल्या स्थानिक आघाडीसाठी हा मतदार संघ सोडला जाण्याची सूतराम शक्यता नाही; परंतु परभणीत जशी राष्ट्रीय समाज पक्षाला जागा सोडण्यात आली, तशी पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीला जागा सोडण्याबाबत चर्चा सुरू आहे. या चर्चेत काही अर्थ नसला, तरी प्रत्यक्षात मात्र जर बहुजन विकास आघाडीला हा मतदारसंघ सोडला तर शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे प्रचंड नुकसान होईल असे वक्तव्य गावीत यांनी केले आहे.

पालघरचा तिढा सुटला
पालघर लोकसभा मतदारसंघ अजून कोणाच्या वाटेला गेला हे ठरले नसले, तरी त्याचा तिढा लवकरच सुटेल. नाशिक, पालघर आणि ठाण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला आहे. मतदारसंघ कोणाच्या वाटेला हे ठरले नसले, तरी माझी उमेदवारी निश्चित आहे, असा दावा खासदार गावित यांनी केला. वरिष्ठांनी सांगितलेल्या सूचनेनुसारच आपण मतदारसंघात काम सुरू केले आहे. प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली आहे. पक्ष कोणताही असला आणि चिन्ह कोणते असले, तरी उमेदवार मीच आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.

तूर्त प्रचारावर लक्ष
बहुजन विकास आघाडीला हा मतदारसंघ सोडला आणि आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, तर काय करणार या प्रश्नावर खासदार गावित म्हणाले, की याबाबत आपण आपल्या वरिष्ठांशी चर्चा करू आणि त्यानंतरच निर्णय घेऊ. तूर्त तरी आपण मतदार संघात बैठका आणि संपर्कावर भर दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस, एस. आर. पी. एफ. आणि केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान अशी आहे तिहेरी ‘स्ट्राँग’ सुरक्षा ; कुठं? अहो, वाचा की मग सविस्तर…!

लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी नगर आणि शिर्डी मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर...

शिस्तबद्ध अशा पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची बारकाईनं काळजी घ्या : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या सूचना…!

आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. जगातला सर्वात शिस्तबद्ध असा हा पालखी...

कांद्याची निर्यात 35 टक्क्यांनी वाढली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी कांद्याच्या प्रश्नावर काहीच बोलत नाही, यावरुन मध्यंतरी मोठी नाराजी पसरली होती....

8 लाख 69 हजारांची ‘इर्टिगा’ मिळतेय 3 लाख 95 हजारांना ; कसला विचार करताय मग?

वाहन विक्रीच्या क्षेत्रातल्या नामांकित मारुती कंपनीची इर्टिगा या लोकप्रिय कारला 1462 cc ची चार...