नगर-माजी महापौर व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी अचानक आदल्या रात्री त्यांच्या घरी जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला व यावेळी आपण आमदारकीला उभे राहावे अशी मागणी केली,त्यासाठी त्यांनी पक्षाचे चिन्ह तुतारी पण वाजवली.
कळमकर यांच्या इथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते वाद्य व तुतारी घेऊन आले.त्यांनी कळमकर यांचे अभिष्टचिंतन केलं व त्यांच्या घराबाहेर वाद्याच्या गजरात आतषबाजी करत तुतारी वाजवली व त्यांचा वाढदिवस साजरा केला व निवडणुकीस उभे राहावे अशी मागणी केली.
या तुतारीची आज दिवसभर सगळीकडे चर्चा चालू होती