गुन्हेगारीआमची 'सेटिंग' थेट एसपी ऑफिसपर्यंत ; हप्ता दे, नाही तर तुला मारून...

आमची ‘सेटिंग’ थेट एसपी ऑफिसपर्यंत ; हप्ता दे, नाही तर तुला मारून टाकू ; शेअर मार्केट व्यावसायिकाला दिली दोघांनी धमकी ; शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

spot_img

नेवासे तालुक्यातल्या दोघांनी शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवून सात लाख रुपये दर महिन्याला खंडणी दे. आमची सेटिंग थेट एसपी ऑफिसपर्यंत आहे. पोलीस आम्ही मॅनेज केलेले आहेत. तुझ्या विरोधात अर्ज देऊन तुला बदनाम करू. हप्ता दे नाही तर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शेअर मार्केट व्यावसायिकानं या संदर्भात शेवगाव पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे, की ‘मी शेअर मार्केट आणि शेती हा व्यवसाय करतो आहे. फेब्रुवारी महिन्यात मी शेतीमध्ये काम करत असताना नेवासे तालुक्यातले दोघं आले आणि चाकूचा धाक दाखवत म्हणाले, तू शेअर मार्केटमधून खूप पैसे कमवले आहेत. आम्हाला सात लाख रुपये महिना हप्ता दे. नाही तर तुला मारून टाकू. हप्ता दिला नाही तर सर्व कार्यालयांत तुझ्याविरुद्ध अर्ज करून तुला परेशान करून सोडू’.

दरम्यान, या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्या दोन तरुणांपैकी योगेश चावरे असं एकाचं नाव आहे. शेअर मार्केट व्यावसायिकाला धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असली तरी यामध्ये अनेकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. त्यासाठी शेवगावचे पोलीस पुढाकार घेतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वडेट्टीवार, अजमल कसाबच्या कुटुंबियांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्या : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य …!

'स्वार्थी राजकारणासाठी काही नेते इतक्या नीच पातळीला जात आहेत, की ते देशाशी गद्दारी करत...

तुमच्या नातवाला अभिमान वाटेल असं काम करा : असं का म्हणाले असतील भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे?

'येणाऱ्या 2047 मध्ये तुमच्या घरातला अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नातू ज्यावेळेस तुम्हाला विचारील, 'बाबा...

शरद पवार तर वस्ताद आणि वस्ताद एक डाव राखून ठेवतोच ; कोणाच्याही दहशतीला बळी पडू नका : आमदार रोहित पवार यांचं आवाहन

'महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक पैलवान आहेत. त्या पैलवानांचा एक वस्ताद असतो. हा वस्ताद नेहमी एक...

देशात सर्व धर्मांचं ऐक्य टिकायला हवं : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वक्तव्य

'या देशाला शांतीचा संदेश महात्मा गांधींनी दिला, अहमदनगरच्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषींनी दिला. अहमदनगर (अहिल्यानगर)...