अहिल्यानगर शहर आणि परिसरातले ओढे – नाले यांचे नैसर्गिक प्रवाह या महानगरपालिका प्रशासनानं बंदिस्त करुन त्या जागेवरच मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या असल्याचा आरोप ८० वर्षीय ‘अँग्री यंग मॅन’ शशिकांत चंगेडे यांनी केला असून महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराविरुद्ध त्यांचा अथक पाठपुरावा सुरुच आहे.
येत्या १५ मेपर्यंत मोकळे बंदिस्त करण्यात आलेले हे प्रवाह मोकळे झाले नाही तर प्रशासनाला नागरिकांच्या जिवित आणि वित्तीय हानीला आपत्कालीन परिस्थितीत सामोरे जावे लागणार आहे.
याची गंभीरपणे दखल घेऊन आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक कृती मंच अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी ‘महासत्ता भारत’शी बोलताना व्यक्त केली आहे.