पुण्यातल्या एकासह अनेकांची ऑनलाईन शेअर ट्रेडींगमध्ये दोन कोटी 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलीय. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाधान शंकर कदम (वय 45 रा. बालेवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निलेश भास्कर टिळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाइन शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त ‘रिटर्न्स’ देण्यात येईल, असं आमिष आरोपीनं दाखवलं. या प्रलोभनाचा हावरटपणा फिर्यादीला चांगलाच नडला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड पुढील तपास करत आहेत.