राजकारणशिंदे गटाच्या राजेंद्र गावित यांची उमेदवारी जवळपास निश्चित., बहुजन विकास आघाडीची शिट्टी...

शिंदे गटाच्या राजेंद्र गावित यांची उमेदवारी जवळपास निश्चित., बहुजन विकास आघाडीची शिट्टी कधी वाजणार?

spot_img

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघात सर्वात अगोदर महाविकास आघाडीने उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर झाली असून भाजपचा तसाच पक्षांतर्गत विरोध असतानाही खासदार राजेंद्र गावित यांनी हा मतदार संघ राखण्यात यश मिळवले आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात या वेळी तिरंगी- चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाट्याला आला आहे. यापूर्वी पालघरच्या दौऱ्यात ठाकरे यांनी कामडी यांच्या उमेदवारीचे सूतोवाच केले होते. त्यानुसार आज महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून कामडी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. सध्या पालघर मतदार संघ महायुतीकडे असला, तरी या महायुतीत मतदारसंघ भाजपला की शिवसेना शिंदे गटाला असा पेच बराच दिवस होता. आता शिवसेनेच्या शिंदे गटाकडेच हा मतदार संघ राहण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.

खा.गावित यांच्यावर पुन्हा विश्वास
पालघर जिल्ह्याच्या निर्मितीतील तसेच विविध विकास कामातील योगदान आणि त्यांचा मतदारसंघात असलेला दांडगा संपर्क आणि त्यांच्या कामाची पद्धत लक्षात घेऊन शिवसेनेच्या शिंदे गटाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. मतदारसंघ भाजपला द्या किंवा उमेदवार तरी बदला अशा दोन्ही पर्यायावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काट मारली असून गावित यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

आज दुपारी उमेदवारी जाहीर करणार
आज गावित यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बहुजन विकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याचे जाहीर केले आहे पक्षाचे प्रवक्ते आजीव पाटील यांनी तशी घोषणा केली होती. दोन दिवसांत मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करू, असे त्यांनी सांगितले होते; परंतु चार दिवस होऊनही बहुजन विकास आघाडीला या मतदारसंघाचा उमेदवार कोण हे अद्यापही ठरवता आले नाही

पाटील की निमकर?
आमदार राजेश पाटील, माजी मंत्री मनीषा निमकर आणि अन्य उमेदवाराची नावे चर्चेत असली, तरी प्रत्यक्षात बहुजन विकास आघाडीने उमेदवार जाहीर केलेला नाही. माजी खासदार बळीराम जाधव हे पालघर लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार. नंतर प्रत्येक निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्रमाकांची मते मिळाली होती. प्रत्येक वेळी बळीराम जाधव हेच उमेदवार होते. त्यामुळे बहुजन विकास आघाडी निमकर की आमदार पाटील यापैकी कुणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तिरंगी, की चौरंगी?
जिजाऊ संघटनेच्या नीलेश सांबरे यांनी पालघर लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. त्यांचा उमेदवार कोण असेल, तो किती प्रभावी असेल यावर या मतदारसंघातील लढत तिरंगी होईल की चौरंगी होईल हे समजू शकेल; परंतु सध्या तरी खा. गावित आणि भारती कामडी यांची उमेदवारी निश्चित झाली आहे?

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...