राजकारणविकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा खा. गावित यांचा निर्धार..! पालघरमधे...

विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा खा. गावित यांचा निर्धार..! पालघरमधे हॅट्रिक करण्यासाठी सरसावले: सर्वसमावेशक धोरणालाच पुढे नेणार..,

spot_img

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपाचा प्रश्न अद्याप सुटला नसला, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या खासदार राजेंद्र गावित यांनी आपल्या विकासकामाच्या जोरावरच पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या इतिसाहात कधी नव्हे एवढी एक हजार कोटी रुपयांची रक्कम आणून तिथल्या नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढला.

खा. गावित यांनी आता पालघरशी आपली विकासाची नाळ जोडली आहे. त्यांनी पालघर जिल्ह्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्हा निर्मितीत खा. गावित यांचे मोठे योगदान आहे.

पालघरला देशातील मॉडेल रुग्णालय
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा विस्तार थेट वसई विरारपर्यंत करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. वसई-विरार मेट्रो ट्रेन करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. राज्यातील नव्हे, तर देशातील प्रथम क्रमांकाचे मॉडेल रुग्णालय म्हणून त्यांनी पालघरच्या जिल्हा रुग्णालयासाठी विशेष प्रयत्न करून २१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा, यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रादेशिक पाणी योजनांसाठी राज्य सरकारने १२४८ कोटी रुपये दिले. तर त्यांच्याच प्रयत्नांतून वसई येथे पासपोर्ट कार्यालय सुरू झाले.

वसई विरारला घनकचरा व्यवस्थापन व बंदिस्त गटार योजना
केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत घनकचरा व बंदिस्त गटार योजनेसाठी वसई-विरार महानगरपालिकेला एक हजार १०१ कोटी रुपये एवढा मोठा निधी मंजूर झाल्याच्या दिवशी तिथल्या नागरिकांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली . वसई-विरारच्या इतिहासात एवढा मोठा निधी कधीच झाला नव्हता. नागरी भागातील प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याच्या आरोपाला त्यांनी कृतीतून उत्तर दिले आहे.

सातपाटी बंदराचा विकास
पालघर जिल्हा सागरी, नागरी आणि डोंगरी अशा तीन विभागात आहे. या सर्व विभागांचा सर्वंकष विकास व्हावा, असा खा. गावित यांचा प्रयत्न असतो. सातपाटी मासेमारी बंदर विकासासाठी केंद्रीय मत्स्य विभागाकडून त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे २८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. डहाणू- कासा-जव्हार-मोखाडा-नाशिक लोहमार्ग महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार योजनेतून करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हे काम सुरू केले, तर स्थानिकांना रोजगार मिळेल आणि कामही होईल, यावर त्यांचा भर आहे.

लोहमार्गाचे चौपदरीकरण
मुंबई रेल विकास कार्पोरेशनमार्फत विरार-डहाणू दरम्यान तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून नवीन ट्रॅक टाकण्यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. त्यामुळे आता उपनगरी व अन्य गाड्यांचा वेग वाढला आहे. चाकरमान्यांचा प्रवास गतीमान झाला आहे. डहाणू-विरार उपनगरी रेल्वेसाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

पर्यटन विकासावर भर
वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरवस्था यावर उपाय म्हणून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून ‘नॅशनल हायवे ॲथारिटी ऑफ इंडिया’ मार्फत साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात त्यांना यश आले. जव्हार येथे दोनशे खाटाच्या रुग्णालयासाठी ९५ कोटी रुपयांची तरतूद त्यांच्याच सातत्याच्या पाठपुराव्यामुळे झाली आहे. याशिवाय केळवे, शिरगाव, चिंचणी, डहाणू बोर्डी, जव्हार आदी ठिकाणी पर्यटन विकास करण्याचा खा. गावित यांचा प्रयत्न आहे. अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेंतर्गत पालघर स्थानकाचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी त्यांनीच पाठपुरावा केला. त्यासाठी ऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे पालघरच्या रेल्वे प्रवाशांच्या समस्या सुटून या स्थानकावर आता वंदे भारत तसेच लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना थांबा मिळणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज पाटील साहेब! बिल्डर अग्रवालला कधी करताय अटक?

पुण्यातल्या कल्याणीनगर भागात पहाटे झालेल्या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोष्टा या तरुण-तरुणीचा...

बेजबाबदार व्यावसायिक आणि स्थानिक पोलीसच ठरलेत राहुरीचे व्यापारी कुंदनमल सुराणा यांचे बळी…!

नगर - मनमाड महामार्गालगतचं अत्यंत गजबजलेलं, सतत वर्दळीचं आणि प्रचंड अतिक्रमणाचं शहर म्हणजे राहुरी...

विद्यार्थी मित्रांनो! तयार आहात ना? कारण उद्या लागणार आहे 12 वीचा निकाल …!

राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांचे बारावीच्या निकालाकडे लक्ष लागून होतं. अखेर राज्याच्या शिक्षण मंडळानं बारावीच्या निकालाची...

सोनं – चांदी खरेदी करतोस का रे भावा? आकाशाला भिडलेत सोन्या – चांदीचे दर…!

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याला आजपासून (दि. २०) सुरुवात झाली आहे. तुम्ही म्हणाल बातमी तर...