राजकारणलोकसभेच्या निवडणुकीत उभे राहणार 500 उमेदवार ; संभाव्य अहिल्यादेवीनगरमध्ये (सध्याचं अहमदनगर) सकल...

लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहणार 500 उमेदवार ; संभाव्य अहिल्यादेवीनगरमध्ये (सध्याचं अहमदनगर) सकल मराठा समाजाचा झाला निर्णय…!

spot_img

महापालिकेचे प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी महासभेत नामांतराच्या मंजुरीनुसार अस्तित्वात येणाऱ्या संभाव्य अहिल्यादेवीनगर (सध्याचं अहमदनगर) जिल्ह्यात सकल मराठा समाजाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला गेला. तो म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातल्या प्रत्येक गावांतून दोन उमेदवार उभे केले जाणार आहेत. अहिल्यादेवी नगरमध्ये या निवडणुकीत तब्बल 500 उमेदवार उभे केले जाणार आहेत.

दरम्यान, बीड जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीत 2 हजार 534 उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. सरकारनं दिलेली एसईबीसी सवलत मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी लाथाडून लावली. त्यानंतर त्यांची एस.आय.टी. चौकशी करण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि त्या निर्णयाला विधानसभेच्या अध्यक्षांनी मंजुरीदेखील दिली.

या निर्णयामुळे मराठा समाजात साहजिकच असंतोष पसरला. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत सकल मराठा समाजानं प्रत्येक गावातून दोन उमेदवार लढविण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या निवडणुकीत तब्बल 5 हजार उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. राजकीय व्यासपिठांवर मराठे जाणार नाहीत, जरांगे पाटील जो निर्णय घेतील, तो निर्णय सर्वांनी मान्य करायचा, असा ठरावही सकल मराठा समाजाच्या या बैठकीत घेण्यात आला.

… म्हणून सकल मराठा समाजाचा हा निर्णय…!

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे हजारो उमेदवार उभे करायचे. यामुळे ईव्हीएम मशिन्स अपुऱ्या पडतील. सरकारची दमछाक होईल. यामुळे राज्यात आणि देशात सरकार स्थापन होऊ शकणार नाही. सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट होईल. हे व्हावं, म्हणूनच सकल मराठा समाजानं हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...