राजकारणभाजप हा भेकडांचा, भ्रष्ट आणि खंडणीखोर पक्ष: उद्धव ठाकरे यांची...

भाजप हा भेकडांचा, भ्रष्ट आणि खंडणीखोर पक्ष: उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका; महाराष्ट्रात पवार, ठाकरे यांचीच नाणी वाजणार!

spot_img

पालघरः पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी आपला परिवार आपला परिवार असा उल्लेख करीत असले, तरी त्यांच्या परिवारात फक्त मोदी आणि त्यांची खुर्ची हे दोघेच शिल्लक आहे, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधान होण्यासाठी साहाय्य केले, तिलाच तुम्ही संपवायला निघाला आहात, अशी टीका करताना त्यांनी भाजपला भेकडांचा भ्रष्ट आणि खंडणीखोर पक्ष असल्याचे प्रहार केले.

पालघर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ठाकरे यांनी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चांगलीच पिसे काढली. मी देशाच्या पंतप्रधानावर टीका करत नसून पंतप्रधानांबद्दल मला आदर आहे; परंतु मी मोदी या व्यक्तीवर टीका करीत असल्याचे ठाकरे म्हणाले.

विकासाच्या नावाखाली मित्राचा खिसा भरण्याचे काम
ते म्हणाले, की मोदी हे त्यांच्या मित्रांचा खिसा विकासाच्या नावाखाली भरत आहेत, हे आम्ही कदापि होऊ देणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला. वाढवण बंदरांना स्थानिक लोकांचा विरोध असताना त्यांनी निवडणूक तोंडावर मोठा फौजफाटा आणून जनसुनावणी घेतली. आता रणगाडे आणून ते पुन्हा जनसुनावणी घेतील; परंतु वाढवण बंदर कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राला विध्वसंक उद्योग
महाराष्ट्राच्या वाट्याला विध्वंसक उद्योग द्यायचे आणि चांगले उद्योग गुजरातला न्यायचे ही मोदी यांची नीती असून या नीतीला आमचा ठाम विरोध आहे, असे त्यांनी सांगितले. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. केवळ गुजरातचे नाहीत असे निदर्शनास आणून देऊ ठाकरे म्हणाले, की देशात तीनशेहून अधिक जागा मिळवून ‘इंडिया’ आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. त्या वेळी आम्ही कोणताही प्रांतभेद न करता गुजरात आमचेच आहे, असे समजून गुजरातच्या वाट्याचे गुजरातला देऊ; परंतु महाराष्ट्राच्या वाट्याचे मात्र कुणाला ओरबाडू देणार नाही. मोदी तिथे असले, तरी हे होऊ देणार नाही अशी टीका त्यांनी केली.

भाजपचे तोंड शेणाने माखलेले
ज्या शिवसेनेने भाजपला मोठे केले, तो भाजप आता मूळचा भाजप राहिला आहे का, असा सवाल करून शाह यांच्यासोबत कोण कोण आहेत, हे त्यांनी एकदा तपासून पाहिले पाहिजे. इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारा पक्ष नखशिखांत भ्रष्टाचारात बरबटलेला आहे. दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेण्या अगोदर तुमचे तोंड शेणाने माखले आहे, ते पाहा असा सल्ला त्यांनी दिला.

भ्रष्ट मांडीला मांडी लावून
महाराष्ट्र ठाकरे आणि पवार यांचा आहे. त्यांचेच नाणे महाराष्ट्रात वाजणार आहे, हे मोदी यांना जाणवल्यामुळेच त्यांनी पक्ष फोडले. ज्यांच्यावर खंडणीचे, गैरव्यवहाराचे आरोप केले त्यांनाच आता मांडीशी बसवून घेतले. सत्तर हजार कोटी रुपयांचे सिंचन घोटाळा करणारे आता तुम्हाला कसे चालतात, असा सवाल करून ठाकरे म्हणाले, की मी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून मला सोडून काही मिंधे तिकडे गेले; परंतु शरद पवार यांनी तर त्यांचा विचार अद्यापही सोडलेला नाही. ते अजून हयात आहेत, तरी त्यांना अजित पवारांनी का सोडले याचे उत्तर संबंधितांनी द्यायला हवे. दिल्लीचे फोन आले तर अजूनही हे सतरंज्या उचलण्याचे काम करतात, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केली.

देईल साथ, त्याचा करील घात
भाजपची नीती ‘देईल त्यांना साथ करेल, त्यांचा घात’ अशी आहे. ज्यांनी मोठे केले, ज्यांनी अडचणीच्या काळात साथ दिली, त्यांनाच आता ते संपवायला निघाले आहेत, अशी टीका करून ते म्हणाले, की पालघरच्या विकासाच्या नावाखाली मित्रांचे खिसे भरण्याचा उद्योग होत असेल, तर तो कदापि होऊ देणार नाही. वाढवण बंदराऐवजी आम्हाला येथे विमानतळ आणि जव्हारसारख्या ठिकाणी हिल स्टेशन उभारण्यात रस आहे.या वेळी खासदार संजय राऊत, आमदार विनोद निकोले आमदार सुनील भुसारा, लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी, कॉम्रेड अशोक ढवळे काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील वाढवण बंदर संघर्ष समितीचे नारायण पाटील,मिलिंद राऊत कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो आदींची भाषणे झाली. ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी प्रथमच भगव्या झेंड्याबरोबर कम्युनिस्ट पक्षाचे लाल झेंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे झेंडे दिसत होते

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

१ कोटींची रोकड, साडेपाच किलो सोनेचांदी; लाच प्रकरणात फरार पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरात सापडले घबाड

बीड : गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला एक कोटी रूपयांची लाच मागितली होती....

लाच मागितली एक कोटीची, तडजोडीअंती द्यायचे ठरले 30 लाख ; पण घात झाला, पाच लाख घेताना अँटी करप्शन विभागानं एकाला घेतलं ताब्यात …!

आपल्या देशातल्या प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये 'लाच घेणं आणि लाच देणं गुन्हा आहे', अशी स्टिकर्स...

पोलीस, एस. आर. पी. एफ. आणि केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान अशी आहे तिहेरी ‘स्ट्राँग’ सुरक्षा ; कुठं? अहो, वाचा की मग सविस्तर…!

लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी नगर आणि शिर्डी मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर...

शिस्तबद्ध अशा पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची बारकाईनं काळजी घ्या : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या सूचना…!

आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. जगातला सर्वात शिस्तबद्ध असा हा पालखी...