राजकारणपालघर लोकसभा मतदार संघात भारती कामडी यांना उबाठा मधून उमेदवारी जाहीर.. शिवसेनेच्या...

पालघर लोकसभा मतदार संघात भारती कामडी यांना उबाठा मधून उमेदवारी जाहीर.. शिवसेनेच्या ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी..,! सामाजिक कार्यात आणि ‘सोशल मीडिया’वर कामडी सक्रिय….

spot_img

पालघरः शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. अपेक्षेनुसार या यादीत पालघर लोकसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कामडी यांना संधी देण्यात आली आहे.

कामडी या पालघर जिल्हा परिषदेच्या दीड वर्ष अध्यक्ष होत्या. २०१४ पासून त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून येत आहेत. त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उमटवला आहे. सातत्याने सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या कामडी यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर होते. शिवसेनेच्या ठाकरे गटात त्यांना फार स्पर्धक नव्हते.

मतदारसंघात अगोदरपासून संपर्क
पालघर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे होता. त्यामुळे ठाकरे यांनी दुसऱ्या यादीत कामडी यांचे नाव जाहीर केले असले, तरी गेल्या एक महिन्यापासून त्यांचेच नाव चर्चेत होते आणि लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास त्यांनी सुरुवात केली होती.

वाढवण बंदराला विरोध कायम
वाढवण बंदराच्या प्रश्नावर त्यांनी ठामपणे भूमिका घेऊन मच्छीमार, स्थानिक शेतकरी आणि अन्य नागरिकांच्या बरोबर राहण्याचा निर्धार व्यक्त केला. पालघर जिल्ह्याला स्थापन होऊन दहा वर्षे झाली असली तरी अजूनही तो विकासात मागे आहे. तरुणांचे रोजगारासाठी स्थलांतर, पेसा भरती अशा विविध मुद्द्यांवर त्या सातत्याने आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत.

लढणार आणि जिंकणार
उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरपासून त्या सक्रिय होत्या. लढणार आणि जिंकणार अशा ठाम भावनेने त्यांनी निवडणुकीची तयारी केली होती. कोरोना काळात त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून तसेच कुपोषण मुक्तीवर भर देऊन आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. कुपोषित बालकांना सकस आहार देण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. कुपोषणमुक्तीत त्यांनी केलेल्या कामाची दखल घेतली गेली.

तौक्ती चक्रीवादळात मदत
पालघर जिल्ह्यात कोरोना काळात कोरोना लस घेण्याबाबत अनेक जणांमध्ये गैरसमज होते. आदिवासी लोक तर लस घेण्याकडे पाठ फिरवत होते. अशा पार्श्वभूमीवर कोरोनाची लस कामडी यांनी स्वतः घेऊन आपल्या समाज बांधवांना लस घेण्यात प्रवृत्त केले. तौक्ती चक्रीवादळाच्या वेळी त्यांनी स्वतः नुकसानग्रस्त भागात भेटी दिल्या आणि मदत कशी मिळवून देईल देता येईल यासाठी पाठपुरावा केला. त्या काळात मच्छीमाराच्या बोटी, वीटभट्टी, कुक्कुटपालन तसेच अन्य नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे लवकर करून लोकांना मदत कशी मिळेल त्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. पालघर जिल्हा स्वतंत्र झाला. राज्यपालांनी आदिवासी नोकर भरती करण्यासाठी अधिसूचना काढली; पण ती कागदावर राहिली होती. या प्रश्नावर भारती कामडी यांनी सरकारचे लक्ष वेधले होते.

एकनिष्ठेचे फळ
शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वंच कार्यकर्त्यांचा ओढा होता. कामडी यांनाही आमिषे दाखवली जात होती; परंतु त्या ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहिल्या. त्याचे फळ आता त्यांना उमेदवारीतून मिळाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सोनं – चांदी खरेदी करतोस का रे भावा? आकाशाला भिडलेत सोन्या – चांदीचे दर…!

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याला आजपासून (दि. २०) सुरुवात झाली आहे. तुम्ही म्हणाल बातमी तर...

शनिशिंगणापूर इथं होणार 64 लाखांचा चौथरा ; प्रत्यक्ष कामाला झालाय प्रारंभ…!

नेवासे तालुक्यातल्या शनिशिंगणापूर इथं भाविकांनी दिलेल्या दानातून ६१ लाखांचा चौथरा तयार करण्याच्या कामास प्रत्यक्ष...

मुंबईत बॉलीवुड अभिनेत्री करिष्मा कपूर यांच्या हस्ते होणार डॉ.भाऊसाहेब शिंदे चा सन्मान

अहमदनगर : युवा समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तज्ञ बुध्दीमान म्हणूण ओळखले...

लिटिल चॅम्प’ कार्तिकी गायकवाडचा नवरा करतोय ‘हा’ व्यवसाय…!

अगदी बालवयातच गायन कलेत उत्तुंग यश मिळवत भिंगारच्या कार्तिकी गायकवाडनं गायिलेल्या गाण्यातून महाराष्ट्राला वेड...