अँन्टी करप्शनपाटबंधारे विभागाच्या 'या' लाचखोर महिला अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल ; एका महिला अधिकाऱ्याला...

पाटबंधारे विभागाच्या ‘या’ लाचखोर महिला अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल ; एका महिला अधिकाऱ्याला अटक ; नगर एसीबीची मोठी कारवाई…!

spot_img

केलेल्या कामाचं बिल अदा करण्यासाठी लाच स्वीकारल्या प्रकरणी नगरपालिका विभागाच्या एक आणि नाशिक पाटबंधारे विभागाच्या एक अशा दोन महिला अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर अँटी करप्शन ब्युरोच्या पथकानं ही मोठी कामगिरी केली आहे.

रुबिया मोहम्मद हनिफ शेख (वय-35 वर्षे, पद – सहायक अभियंता, वर्ग-1,
नेमणूक – पाटबंधारे संशोधन व जल नि:सारन उप विभाग, अहमदनगर,
जि.अहमदनगर
रा. प्लॉट नं. 365, गाढेकर चौक, निर्मल नगर, अहमदनगर) आणि रजनी पाटील
(कार्यकारी अभियंता, वर्ग – 1
पाटबंधारे संशोधन विभाग, MERI,
दिंडोरी रोड, नाशिक
रा.603, हरी आमंत्रण, कबरा सरीच्या समोर, दत्त मंदिर रोड, नाशिक रोड, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या पाटबंधारे विभागाच्या लाचखोर महिला अधिकाऱ्यांची नावं आहेत.

यातील तक्रारदार यांच्या कार्यक्षेत्रातल्या (उंबरे, ता. राहुरी) येथील पूर्ण झालेल्या कामाचं देयक 7 लाख 75 हजार 963 रुपये अदा केलं. म्हणून सदर कामाच्या अदा केलेल्या बिलाच्या यातील आरोपी लोकसेवक शेख यांनी स्वतः साठी 8 टक्के प्रमाणे आणि आरोपी लोकसेवक रजनी पाटील यांच्याकरिता 10 टक्के प्रमाणे असे एकूण 18 टक्के प्रमाणे 1 लाख 39 हजार 500 रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबत ची तक्रार
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर यांच्याकडे काल (दि. 18) रोजी प्राप्त झाली होती.

त्यानुसार लाच मागणीची पडताळणी करण्यात आली असता सदर लाच मागणी
पडताळणी दरम्यान आलोसे क्र 1 श्रीमती रुबिया शेख यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर कामाचे अदा केलेल्या बिलाच्या रकमेचे स्वतःसाठी
8 टक्के प्रमाणे व आलोसे क्र.2 श्रीमती पाटील यांच्याकरिता 10 टक्के प्रमाणे असे एकूण 18 टक्के लाचेची मागणी करत असल्याचे निष्पन्न झालं.
त्यानुसार काल (दि 18) श आलोसे क्र.1 श्रीमती रुबिया शेख यांच्याविरुद्ध सापळा कारवाई आयोजित करण्यात आला. सदर सापळा कारवाईमध्ये आलोसे क्र.1 रुबिया शेख यांनी
18 टक्क्यांच्या पहिला हप्ता म्हणून 62 हजार रुपये पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून स्विकारला. त्यावेळी त्यांना लाच रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आलं.

तसेच सदर लाच रक्कम स्वीकारणेस आलोसे क्रमांक 2 श्रीमती रजनी पाटील यांनी दुजोरा दिला म्हणून
आलोसे क्र.1 श्रीमती रुबिया शेख व आलोसे क्र.2 रजनी पाटील यांचे विरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मो. नं.
93719 57391),
माधव रेड्डी (अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक
मो नं 9404333049),
नरेंद्र पवार (वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 9822627288)
यांच्या मार्गदर्शनाखाली
सापळा अधिकारी प्रवीण लोखंडे (पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. अहमदनगर मो.नं.797254720, सहायक सापळा अधिकारी शरद गोर्डे
(पोलिस निरीक्षक,
ला.प्र.वि.अहमदनगर
मो.नं.771904432) पोलीस अंमलदार
रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, किशोर लाड महिला पोलीस अंमलदार
राधा खेमनर, सना सय्यद चालक पोलीस अंमलदार
हरून शेख आदींनी ही कारवाई केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...