राजकारणनगर दक्षिण मतदार संघात डॉ. सुजय विखेंचा विजय पक्का ; मुख्यमंत्री आणि...

नगर दक्षिण मतदार संघात डॉ. सुजय विखेंचा विजय पक्का ; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आत्मविश्वास…!

spot_img

प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्यांची महाविकास आघाडी यांच्याकडे सामान्य माणसाला काहीच किंमत नाही. त्यांचे नेते स्वतःला इंजिन समजतात. मात्र त्यांच्याकडे सामान्य माणसाला बसण्यासाठी डबेच नाहीत. परंतु महायुतीकडे मात्र सामान्य माणसाला बसण्यासाठी अनेक डबे आहेत. महायुतीकडे नरेंद्र मोदी नावाचे शक्तिशाली इंजिन आहे. त्यामुळे नगरसह देशाचा विकास आगामी काळात प्रचंड वेगाने होणार आहे, अशी ग्वाही देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस नगर दक्षिण मतदार संघात डॉक्टर सुजय विखे यांचा विजय पक्का आहे, असा आत्मविश्वास व्यक्त केला.

डॉ. सुजय विखे यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत नगर शहरात भव्य सभा पार पडली.

या सभेला मंत्री दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, बाबूशेठ टायरवाले, अभय आगरकर, भैया गंधे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘देशातल्या सामान्य माणसाला पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना दिल्या. देशाचा विकास करायचा असेल तर मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनाच विजयी करा’.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होण्याचा अधिकार नरेंद्र मोदी यांनाच आहे. विरोधी महाविकास आघाडीकडे पंतप्रधानपदाचा उमेदवारच नाही. सामान्य माणसाला तिथे काहीही संधी नाही. महायुतीकडे शक्तिशाली इंजिन असून सामान्य माणसाला बसण्यासाठी अनेक डबे आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. सुजय विखे यांना पुन्हा एकदा सेवेचे संधी द्या’.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...