गुन्हेगारी'तो' पोलीस असल्याचं सांगून लक्झरी बस लुटायचा ; 9 वर्षांपासून पोलिसांना चकवा...

‘तो’ पोलीस असल्याचं सांगून लक्झरी बस लुटायचा ; 9 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होता ; अखेर केलाच जेरबंद ; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी …! 

spot_img

दिनांक 28 एप्रिल 2015 रोजी रमेशभाई भाईचंद पटेल (रा. नवाधर कोसा, ता. विसनगर, जिल्हा मेहसाना, गुजरात, हल्ली रा. सावंत चेंबर्स, ख्रिस्तगल्ली, अहमदनगर) हे अहमदनगर येथून लक्झरी बसनं सुरत, गुजरात येथे होते. शिर्डी येथील खंडोबा मंदीरा समोर 2 अनोळखी इसमांनी फिर्यादी व साक्षीदार यांना पोलीस असल्याची बतावणी करत ‘तुम्ही चोरी करुन आले असून पोलीस स्टेशनला चला’, असे म्हणत लक्झरी बसमधून खाली उतरवुन तवेरा गाडीत बसवले.

फिर्यादी पटेल यांच्या जवळील 5 लाख रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून ते अनोळखी इसम घेवून गेले.  फिर्यादी पटेल यांना त्या दोघांनी कोपरगांव इथं सोडून दिलं. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात (गु.र.नं. 138/2015 भादंविक 395, 363, 170, 34 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासात तत्कालीन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचा तपास करुन आरोपी नामे 1) राजेंद्र मोहन फडतरे, 2) विकास पोपट झरेकर, 3) मनोज दत्तात्रय शिंदे, 4) सचिन प्रकाश राजगुरु (सर्व रा. केडगांव, अहमदनगर), 5) पंकज तान्हाजी गडाख (रा. टाकळी काझी, ता. नगर), 6) मच्छिंद्र पोपट कांडेकर रा. केडगांव, ता. नगर (फरार) व 7) नितीन पटेल (रा. कोर्ट गल्ली, अहिल्यानगर) असे आरोपी निष्पन्न करुन आरोपी क्र. 1 ते 5 व 7 यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला होता. परंतु आरोपी मच्छिंद्र पोपट कांडेकर हा अद्यापपर्यंत फरार होता.

राकेश ओला, (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर) यांनी पोनि दिनेश आहेर यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातल्या फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन मिळून आल्यास आवश्यक कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.

नमुद आदेशान्वये पोनि आहेर यांनी सफौ राजेंद्र वाघ, रविंद्र कर्डिले, विशाल दळवी, देवेंद्र शेलार, मयुर गायकवाड व उमाकांत गावडे अशांचे पथक नेमून फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देत पथकास रवाना केले. पथक फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना पथकास वर नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी नामे मच्छिंद्र पोपट कांडेकर (रा. केडगांव, अहमदनगर) याची माहिती काढत असताना तो गोंदीया, नागपूर व झारखंड या ठिकाणी त्याचे नाव बदलून, ओळख लपवून राहत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.

सदर आरोपी काल दिनांक 28 मार्च 2024 रोजी कात्रड, वांबोरी (ता. राहुरी) येथे त्याच्या नातेवाईकांकडे येणार आहे, अशी माहिती गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर मिळाली. पथकाने लागलीच कात्रड, वांबोरी, ता. राहुरी येथे जाऊन फरार आरोपीच्या नातेवाईकांच्या वास्तव्याबाबत माहिती घेत नातेवाईकांच्या घराच्या आजुबाजूला सापळा रचून हे पोलीस पथक थांबले असताना सदर ठिकाणी तोंड बांधलेला इसम संशयितरित्या घरामध्ये गेल्याचे दिसून आल्याने पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन संशयितास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव मच्छिंद्र पोपट कांडेकर (रा. एकनाथ नगर, केडगांव, ता. नगर) असे असल्याचे सांगितले.

त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता आरोपीने सन 2015 मध्ये रमेश भाईचंद पटेल हे हवालाची 5 लाख रुपये रोख रक्कम अहमदनगर येथून लक्झरी बसणे सुरत, गुजरात येथे जाणार असल्याने त्यांचे लक्झरी बसचा अहमदनगर येथुन तवेरा गाडीतून पाठलाग करत त्यांना शिर्डीत लुटल्याचं सांगितल.

आरोपी नामे मच्छिंद्र पोपट कांडेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द दरोडा व गंभीर दुखापत अन्वये एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. 9 वर्षांपासून फरार असलेल्या या गुन्हेगाराला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.  

सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...