राजकारणतीन अपत्य प्रकरणी पदवीधर शिक्षकाला नोटीस निघणार: दोन वर्षांनी चौकशीला मुहूर्त., पदवीधर...

तीन अपत्य प्रकरणी पदवीधर शिक्षकाला नोटीस निघणार: दोन वर्षांनी चौकशीला मुहूर्त., पदवीधर शिक्षकाचे दणाणले धाबे..!

spot_img

पालघरः (योगेश चांदेकर) – सहकार कायद्याच्या नियमानुसार एक सप्टेंबर २००२ नंतर तिसरे अपत्य झाले असल्यास संबंधितांना सहकारी संस्थेचे संचालक होता येत नाही. असे असताना पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक हे दोन वेळा ठाणे/पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक झाले. आता त्यांच्या अपात्रतेविषयी सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी चौकशी सुरू केली असून संबंधित शिक्षक तसेच त्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्यांनाही नोटिसा बजावून संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे.

संबंधित शिक्षक हे दोन वेळा ठाणे/पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक – कोट्यावधी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या या संस्थेचे मानधन त्यांनी घेतले. त्यांना एक मुलगा व दोन मुली अशी तीन अपत्ये आहेत. त्यापैकी तिसरे अपत्याचा जन्म २९ मे २००४ चा आहे. त्यामुळे सहकार कायद्याच्या सुधारित नियमानुसार संबंधित शिक्षक हे शिक्षक पतसंस्थेची निवडणूक लढवू शकत नाही. ते निवडून आले असले, तरी त्यांना सहकार कायद्याच्या नियमानुसार अपात्र ठरवले जाऊ शकते.

सहनिबंधक करणार चौकशी – गेल्या दोन-तीन वर्षापासून अनेक शिक्षकांनी राज्य निवडणूक आयोग तसेच ठाणे येथील जिल्हा उपनिबंधकांचे दार ठोठावले; परंतु त्यांना न्याय मिळत नव्हता. आता याप्रकरणी मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आल्याने ठाणे जिल्हा उपनिबंधकांनी जरी दखल घेतली नसली, तरी कोकण भवनातील विभागीय सहनिबंधकांनी मात्र त्याची दखल घेतली आहे. सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. आता ते संबंधितांना नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.

कांगावा अंगलट येणार – याप्रकरणी संबंधित शिक्षकाने एक सप्टेंबर २००२ नंतर आपल्याला कोणतेही अपत्य झाले नसल्याचे सांगून कांगावा केला होता; परंतु त्यांना झालेल्या तिसऱ्या अपत्त्याचा दाखला त्यांचे तिसरे अपत्य ज्या शाळेत शिकते, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनीच दिला असल्यामुळे आता मोठा पुरावा तक्रारदारांच्या हाती लागला आहे.

तीनही अपत्यांच्या जन्माचे पुरावे – संबंधित शिक्षकाच्या तीनही अपत्याच्या जन्माचे दाखले तक्रारदारांच्या हाती लागले आहेत. भालेराव चौकशी करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर काहींनी पुरावे थेट त्यांच्याकडे पाठवले आहेत. याप्रकरणी आता विभागीय सहनिबंधक कार्यालयातून कागदपत्रांची शहानिशा करून किती दिवसात निकाल दिला जातो, याकडे पालघर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज पाटील साहेब! बिल्डर अग्रवालला कधी करताय अटक?

पुण्यातल्या कल्याणीनगर भागात पहाटे झालेल्या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोष्टा या तरुण-तरुणीचा...

बेजबाबदार व्यावसायिक आणि स्थानिक पोलीसच ठरलेत राहुरीचे व्यापारी कुंदनमल सुराणा यांचे बळी…!

नगर - मनमाड महामार्गालगतचं अत्यंत गजबजलेलं, सतत वर्दळीचं आणि प्रचंड अतिक्रमणाचं शहर म्हणजे राहुरी...

विद्यार्थी मित्रांनो! तयार आहात ना? कारण उद्या लागणार आहे 12 वीचा निकाल …!

राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांचे बारावीच्या निकालाकडे लक्ष लागून होतं. अखेर राज्याच्या शिक्षण मंडळानं बारावीच्या निकालाची...

सोनं – चांदी खरेदी करतोस का रे भावा? आकाशाला भिडलेत सोन्या – चांदीचे दर…!

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याला आजपासून (दि. २०) सुरुवात झाली आहे. तुम्ही म्हणाल बातमी तर...