गुन्हेगारीगुतंवणूकदारांना देशोधडीला लावणाऱ्या बिग बुल्स आणि त्यांच्या चेल्या चपाटयांना आर्थिक गुन्हे शाखा...

गुतंवणूकदारांना देशोधडीला लावणाऱ्या बिग बुल्स आणि त्यांच्या चेल्या चपाटयांना आर्थिक गुन्हे शाखा करणार जेरबंद ; एम.पी.आय.डी. कायद्याअंतर्गत होणार कठोर कारवाई…!

spot_img

अविनाश देशमुख / शेवगांव

मो. नं. 9960051755

शेअर मार्केटच्या फरार झालेल्या बिग बुल्सनं आपल्या खात्यातून ऑनलाईन खोटे व फसवणुकीचे व्यवहार केले. त्यावर आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर कठोर कारवाई करणार आहे. फक्त फसवणूक झालेल्या हजारो लोकांनी विहित नमुन्यात अर्ज करणे व पुरावे सादर करणे गरजेचे आहे. या लोकांना सेबीची परवानगी कशी मिळाली? या लोकांनी आय. टी. आर. रिटर्न्स भरले नाहीत. यामधून त्यांना सवलत कशी मिळाली?मोठ्या प्रमाणात झालेल्या आर्थिक देवाण घेवाणीतल्या गुंतवणूकदारांकडे लाखो रुपये कुठून आले ? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत.

याचा त्या लोकांनी म्हणजे बिगबुल्सनी शासनाला हिशोब सादर केला होता का, हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूकीची अनेक प्रकरणे शेवगाव तालुक्यात घडली आहेत, घडत आहेत. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत EOW मध्ये एकूण आर्थिक गुन्ह्यांच्या तपास अनेक फर्जी स्कीम गुन्ह्यांचा तपास या कायद्याअंतर्गत लागला आहे.

शेवगाव तालुक्यातले शेअर मार्केटवाले बेकायदेशीर ठेवी घेण्याचेच काम करत आहेत. त्यालाही ‘महासत्ता भारत’ वेब न्यूज नेटवर्कनं अनेक वेळा expose केलं आहे.

दरम्यान, अशा गुन्ह्यांचा तपास खालील दोन कायद्यान्वये केला जातो. पहिला Maharashtra Protection of Depositors Interest Act-1999 ( State Act) आणि दुसरा Banning of Unregulated Deposits Schemes Act- 2018. ( Central Act). शेवगाव तालुक्यातील सर्व गुन्हे या कायद्याखाली येतात. याबाबत कायदेशीर सल्ला या स्वरुपात सहकार्य हवं असल्यास संबंधितांनी 9960051755 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोरोना काळात खासदार डॉ. सुजय विखेंनी केलेल्या मदतीची ‘अशी’ झाली पोलखोल…!

नगर तालुक्यातल्या देऊळगाव सिद्धी इथं खासदार डॉक्टर सुजय विखे यांची सभा होती. सभेला ग्रामस्थ...

… तर पोलिसांविरुद्ध न्यायालयात जाणार : शरद पवार यांचा निर्धार…!

नगर तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर धंदे, वाढती गुन्हेगारी, चोऱ्या, घरफोड्या याकडे स्थानिक पोलिसांचं जाणीवपूर्वक...

अखेर पालघर मतदारसंघ भाजपला; देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच: खासदार गावित हेच उमेदवार असल्याचे संकेत..!

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघातून अखेर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून खासदार राजेंद्र गावित यांच्या...

१ लाख ५० हजार रुपयांत घरी आणा ‘ही’ कार ; पॉवर विंडो, टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम आणि ‘एअरबॅग’चीसुद्धा मिळेल सुविधा…!

दुचाकीच्या किंमतीत कार मिळते, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं, तर त्याला तुम्ही वेड्यात काढाल....