युवा विश्वगरिबांचं आरक्षण काढून मुस्लिम बांधवांना देण्याचा काँग्रेस आणि महाआघाडीचा खतरनाक खेळ :...

गरिबांचं आरक्षण काढून मुस्लिम बांधवांना देण्याचा काँग्रेस आणि महाआघाडीचा खतरनाक खेळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप …!

spot_img

‘चारा घोटाळ्याच्या आरोपावरुन न्यायालयानं ज्यांना शिक्षा ठोठावली, ते बिहारचे लालू यादव आणि काँग्रेस तसंच महाविकास आघाडीचे नेते सामान्य जनतेबरोबर खूप खालच्या पातळीचं राजकारण करत आहेत. स्वतःची ‘व्होट बँक’ मजबूत करण्यासाठी एससी, एसटी, ओबीसी आदींचं संपूर्ण आरक्षण काढून मुस्लिम बांधवांना देण्याचा खतरनाक खेळ महाविकास आघाडी खेळत आहे, असा आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिल्यानगरमध्ये (अहमदनगर) बोलताना केला.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे आणि नगर उत्तर लोकसभा मतदारसंघातले उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ नगरच्या संत निरंकारी भवन मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महासंकल्प सभेत उपस्थित लाखो मतदारांना संबोधित करताना ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दादा भुसे, भागवत कराड, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष ॲड. अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते. काय म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हीच पहा आणि ऐका…!

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...