गुन्हेगारीअपहरण झालेल्या मुलींची सुटका ; एकाला अटक ; नगर एलसीबीची कारवाई  

अपहरण झालेल्या मुलींची सुटका ; एकाला अटक ; नगर एलसीबीची कारवाई  

spot_img

शेवगांव तालुक्यामधून १२ आणि १० वर्षे वयोगटातल्या मुलींना पोपट्या उर्फ पोपट शहादेव बोरुडे याने दि.  19/04/2024 रोजी यांना कसलं तरी आमिष दाखवून पळवून नेलं होतं. सदर घटनेबाबत शेवगांव पोलीस ठाण्यात गु.र.नं. 361/2024 भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर राकेश ओला (पोलीस अधीक्षक, अहमदनगर) यांनी दिनेश आहेर (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर) यांना आरोपीचा शोध घेवून अपहरण झालेल्या मुलींची सुटका करेणबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, सोपान गोरे, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, सचिन अडबल, संदीप चव्हाण, फुरकान शेख, संतोष खैरे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर, भरत बुधवंत, विजय धनेधर, महिला पोलीस अंमलदार छाया माळी यांचे वेगवेगळे दोन पथके तयार करुन आरोपीचा शोध घेऊन अपहरण झालेल्या मुलींची माहिती काढणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.

वरील पोलीस पथकाने गुन्हा घडल्यापासुन शेवगांव शहरातील व शेवगांव ते अहमदनगर जाणारे रोडवरील आजुबाजुचे सी. सी. टी. व्ही. फुटेज चेक केले असता सदर आरोपी हा तीन मुलींना मोटारसायकवर घेऊन जातांना शेवगांव ते अहमदनगर जाणारे रोडवरील मराठवाडीपर्यंत दिसुन आला होता. वरील दोन्ही पथकांनी पुणे, मुंबई, धाराशिव, बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड या जिल्ह्यामध्ये जाऊन आरोपीचे मित्र, नातेवाईक यांचा शोध घेवुन त्यांचेकडे आरोपी व अपहरण झालेल्या मुलींबाबत माहिती घेण्यात आली होती.

वेगवेगळ्या 200 ते 300 ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. फुटेज व आरोपीचे राहते घरी तसेच अपहरण झालेल्या मुलींचे घराचे आजुबाजुच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती घेण्यात आली होती. वरील पोलीस पथके आरोपीची माहिती काढत असतांना दिनांक 28/04/2024 रोजी सुपा परिसरातील एका महिलेने पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना फोनवरुन तीन मुली व एक मुलगा सुपा परिसरामध्ये असल्याची माहिती दिली.

पोनि आहेर यांनी तात्काळ वरील पथकास मिळालेली माहिती कळवून तीन मुली व त्यांचेसोबत असलेल्या मुलाचा शोध घेणेबाबत आदेश दिले. पथकाने सुपा परिसरामध्ये जाऊन बातमीतल्या तीन मुलींचा व त्यांचेसोबत असलेल्या मुलाचा शोध घेत असतांना ते मिळुन आल्याने सदर तीन अल्पवयीन मुली व मुलास ताब्यात घेवुन मुलास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव पोपट उर्फ पोपट्या शहादेव बोरुडे वय 20 वर्षे, असं असल्याचं सांगितलं.

ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन 03 मुली व आरोपी यास पुढील तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शेवगांव पोलीस ठाणे हे करीत आहे. सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाच मागितली एक कोटीची, तडजोडीअंती द्यायचे ठरले 30 लाख ; पण घात झाला, पाच लाख घेताना अँटी करप्शन विभागानं एकाला घेतलं ताब्यात …!

आपल्या देशातल्या प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये 'लाच घेणं आणि लाच देणं गुन्हा आहे', अशी स्टिकर्स...

पोलीस, एस. आर. पी. एफ. आणि केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान अशी आहे तिहेरी ‘स्ट्राँग’ सुरक्षा ; कुठं? अहो, वाचा की मग सविस्तर…!

लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी नगर आणि शिर्डी मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर...

शिस्तबद्ध अशा पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची बारकाईनं काळजी घ्या : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या सूचना…!

आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. जगातला सर्वात शिस्तबद्ध असा हा पालखी...

कांद्याची निर्यात 35 टक्क्यांनी वाढली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी कांद्याच्या प्रश्नावर काहीच बोलत नाही, यावरुन मध्यंतरी मोठी नाराजी पसरली होती....