लेटेस्ट न्यूज़अखेर नगरकरांचं 'टेन्शन' पळालं ; नक्की काय झालं, घ्या जाणून...!

अखेर नगरकरांचं ‘टेन्शन’ पळालं ; नक्की काय झालं, घ्या जाणून…!

spot_img

तब्बल दोन महिन्यांपासून नगरकरांच्या डोक्याला प्रचंड ‘टेन्शन’ होतं. नगरच्या आगरकर मळा, गायके मळा, रेल्वे स्टेशन परिसर या भागातले नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून राहत होते. मात्र वनविभागाच्या प्रयत्नांमुळे बिबट्याला जेरबंद करण्यात आलं आणि नगरकरांचं टेन्शन पळालं.

नगरच्या आगरकर मळा, गायके मळा रेल्वे स्टेशन परिसरात या बिबट्यानं अनेक कुत्री आणि डुकरांचा फडशा पाडला. सुदैवानं या भागात जिवितहानी झाली नाही. मात्र स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं. अखेर ते दूर झाल्यानं नगरकरांनी सुटकेच्या नि:श्वास टाकला.

दरम्यान, या भागात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वन विभागानं आज (दि. १७) सकाळी या भागात पिंजरा लावला. या पिंजऱ्यात बिबट्या आपोआप जेरबंद झाला. दोन महिन्यानंतर बिबट्या जेरबंद झाल्यानं नागरिकांच्या जीवात जीव आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...