गुन्हेगारीनागरदेवळेच्या युवकावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

नागरदेवळेच्या युवकावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

spot_img

पुष्कर संतोष शेलार (रा. नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर) हा युवक नागरदेवळे गावातून त्याच्या मित्रासोबत किराणा माल घेऊन घरी जात असतांना सोहेल चाँद शेख (रा. नागरदेवळे) आणि त्याच्या इतर 7 साथीदारांनी तक्रारदार पुष्करला तलवार, लाकडी दांडके, लोखंडी गजाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अमानुषपणे मारहाण केली.

फिर्यादी पुष्करच्या मित्रालासुध्दा आरोपींनी शिवीगाळ आणि दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.

सदर घटनेबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं. 472/2024 भादवि कलम 307, 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149, आर्म ऍ़क्ट कायदा कलम 4/25, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) /135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यानं राकेश ओला, जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश दिले होते.
नमूद आदेशान्वये पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डिले, संतोष खैरे, रोहित मिसाळ, फुरकान शेख, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, संतोष लोढे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, सचिन अडबल अरुण मोरे यांचे दोन पथके तयार करुन आरोपीची माहिती काढून आरोपींना ताब्यात घेणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.

वरील पोलीस पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देवुन गुन्ह्याचे पार्श्वभुमीची माहिती घेतली. सदर गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा घडल्यानंतर लगेच मोबाईल फोन बंद केलेले असल्याने आरोपीविषयी काही एक माहिती मिळून येत नव्हती. वरील दोन्ही पोलीस पथके आरोपींचे मुकुंदनगर येथील नातेवाईकांकडे माहिती काढत असतांना दिनांक 07/05/2024 रोजी पोनि आहेर, स्था.गु.शा. अहमदनगर यांना सदरचे आरोपी हे मुकुंदनगर या ठिकाणी एका शेडमध्ये लपून बसलेले असल्याची माहिती प्राप्त झाली. पोनि आहेर यांनी प्राप्त माहिती तात्काळ पथकास कळवून आरोपींना ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या.

पोलीस पथकाने बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करता एका पत्र्याचे शेडमध्ये 06 इसम बसलेले दिसले. सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावं विचारली असता त्यांनी त्यांची नावं 1) सोहेल चाँद शेख (वय 26 वर्षे, रा. बुऱ्हानगर रोड, नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर), 2) शोएब चाँद शेख (वय 26 वर्षे, रा. सदर), 3) शोएब हमीद सय्यद (वय 23 वर्षे, रा. गोटीची तालीमजवळ, नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर), 4) अमीन हुसेन पठाण (वय 21 वर्षे, रा. सदर), 5) साहील अकबर पठाण (वय 28 वर्षे, रा. मराठी शाळेमागे, नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर), 6) रियाज उर्फ बाबा मुनीर पठाण (वय 30 वर्षे, रा. विठ्ठल रुक्मिणी मंदीराजवळ, (नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर) अशी असल्याची सांगितली.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाणे करत आहे.

सदरची कारवाई राकेश ओला, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा…! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर बाणा आणि अभ्यासू आमदार अमित गोरखे यांचा तगडा पाठपुरावा…!

... अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा...! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर...

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...